Tuesday, 26 August 2025

मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीची जम्बो कार्यकारिणी जाहीर !!

मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीची जम्बो कार्यकारिणी जाहीर !! 

मुरबाड (श्री. मंगल डोंगरे) : सोमवार, दि २५ ऑगस्ट २०२५ रोजी भिवंडी येथे झालेल्या बैठकीत मुरबाड तालुका काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वाखालील जम्बो कार्यकारिणीला जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी मान्यता दिली. जुलै महिना अखेरी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी चेतनसिंह पवार यांची मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी पुनर्नियुक्त केल्यानंतर त्यांनी नवीन तालुका कार्यकारणी जिल्हा काँग्रेस कमिटी कडे मान्यतेसाठी पाठवण्यात आली होती आणि तिला आजच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबतीत असलेल्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक फनाडे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष महेश धानके, ओबीसी तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, आदिवासी सेल तालुकाध्यक्ष दत्ता खाकर, नेताजी लाटे, जयवंत हरड, रजक शेख, गुरुनाथ देशमुख, सचिन धुमाळ आदि पदाधिकारी मुरबाड येथून उपस्थित होते. नवीन कार्यकारणीमध्ये एकूण ५० पदाधिकारी असून तालुक्यातील वालीवऱ्हे ते पोटगाव व रामपूर ते पाटगाव सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारणी जाहीर करत असून अनंत चतुर्दशी नंतर नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम करणार असल्याचे प्रतिपादन चेतनसिंह पवार यांनी केले. 

सदरील तालुका कार्यकारणी मध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष-३, कोषाध्यक्ष-१, उपाध्यक्ष-४, सरचिटणीस-८, समन्वयक-१, संघटक-५, चिटणीस-७, कार्यकारणी सदस्य-६ आणि मंडल/विभाग प्रमुख- १५ अशा एकूण ५० पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारणी तयार करण्यात आली. मुरबाड तालुका कार्यकारणी ही सर्व समाजातील प्रतिनिधीना तसेच ज्येष्ठ व युवा यांना योग्य स्थान देण्याचे काम तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी केल्याबद्दल त्यांचे कौतुक यावेळी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी केले.

कार्यकारणी मध्ये वरिष्ठ तालुका उपाध्यक्षपदी - पांडुरंग शिंगोळे/ बंधू बेलवले/ भरत विशे, 
कोषाध्यक्षपदी- नेताजी लाटे, तालुका उपाध्यक्षपदी- जयवंत हरड/ गुरुनाथ देशमुख/ मोरेश्वर भोईर/ कांताराम भला,

तालुका सरचिटणीसपदी- मारुती टोहके/ गोविंद शेलवले/मार्तंड आगिवले/ रजाक शेख/ वसंत जमदरे/ सागर गायकवाड/ काळूराम गोंधली/ नरेश कुर्ले,

तालुका समन्वयकपदी- काळूराम विशे,
तालुका संघटकपदी- दामोदर भला/ हरिश्चंद्र पष्टे/ अंकुश धुमाळ/ भरत पवार/ दशरथ चौधरी 

तालुका सचिवपदी- बिपिन भावार्थ/ प्रकाश हिंदुराव/ भगवान तारमले/ संजय विशे/ दीपक आलम/ दिनकर गायकर/ दिलीप शेळके,

कार्यकारणी सदस्य - सिराज अत्तार/ नामदेव कराले/ वसंत शेलवले/ मोहन वाघ/ स्वप्निल जाधव/ हरेश वाघ, 

मंडलप्रमुखपदी - विठ्ठल ठमके असोले, गुरुनाथ वडवले देवगाव, समीर ठाकरे कुडवली, सचिन धुमाळ शिवळे, अजय शेळके सरळगाव, अमोल सूर्यराव किसळ, अनंत तिवार वैशाखारे, जयराम उघडा माळ, पांडुरंग शीद तळेगाव,  कुणाल पवार फांगुलगव्हाण, विपुल सुरोशे धसई, वसंत कराळे खोपिवली, गणेश गायकर डोंगरन्हावे, बालाराम मार्के म्हसा, निलेश आगवले शिरवली पदाधिकारी ची नेमणूक झाली.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...