नागरिकांचा तारणहार ठरले शिवसैनिक श्री. संदेश हरिश्चंद्र पाटील !!
डोंबिवली, प्रतिनिधी : डोंबिवली पश्चिम विभागातील देवीचा पाडा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे खाडी किनारी अचानक पाणी साचून एका चारचाकी वाहनाला अडकावे लागले. ही कार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याची होती. घटनेची माहिती मिळताच शिवसैनिक श्री. संदेश हरिश्चंद्र पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीला धाव घेतली. अडकलेली गाडी धक्का मारून बाहेर काढणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतःच्या मालकीची थार गाडी आणून ती कार सुरक्षित ठिकाणी बाहेर नेऊन ठेवली. “जर गाडी वेळेत बाहेर काढली गेली नसती तर वाढत्या पाण्यामुळे ती वाहून जाण्याची शक्यता होती आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले असते,” अशी प्रतिक्रिया गाडी मालकाने देत श्री. संदेश पाटील यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. गाडी मालकाने दिलेल्या मनापासूनच्या आभारांबरोबरच परिसरातील नागरिकांनीही या धाडसी मदतीचे कौतुक केले.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देत श्री. संदेश पाटील यांनी पुन्हा एकदा आपली जनसेवेची तळमळ अधोरेखित केली.
शिवसैनिक संदेश पाटील हे नेहमीच देवीचा पाडा परिसरातील नागरिकांच्या प्रत्येक लहानसहान प्रश्नात तत्परतेने मदतीला धावून येतात. कोणताही ऋतू असो वा कोणतीही समस्या – त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांना समाधान मिळत असल्याने परिसरातील लोकांचा विश्वास त्यांच्यावर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.
श्री. संदेश पाटील हे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे जिवलग चाहते असून राज्याचे उप-मुख्यमंत्री आदरणिय नामदार श्री. एकनाथ शिंदे यांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते आहेत. “नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीत सोबत उभा राहणारा शिवसैनिक म्हणजेच संदेश हरिश्चंद्र पाटील,” अशी भावना आज देवीचा पाडा आणि आजूबाजूच्या परिसरात दृढ होत आहे.
No comments:
Post a Comment