Friday, 12 September 2025

माॅडर्न मार्शल आर्ट्स ॲकेडमी आयोजित ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप 2025 मध्ये भांडे कराटे क्लासचे घवघवीत यश !!

माॅडर्न मार्शल आर्ट्स ॲकेडमी आयोजित ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप 2025 मध्ये भांडे कराटे क्लासचे घवघवीत यश !!

मुरबाड (मंगल डोंगरे ) : नुकताच मिहीर सेन स्पोर्ट्स काॅम्प्लेक्स मिरा रोड ठाणे येथे हायब्रीड शोतोकन कराटे असोसिएशन इंडिया आणि माॅडर्न मार्शल आर्ट्स ॲकेडमीने आयोजित केलेल्या ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप 2025 मध्ये मुरबाडच्या भांडे कराटे क्लासचे घवघवीत यश संपादन केले असून, तब्बल 48  मेडल सह बेस्ट कराटे टीमची ट्राॅफी जिंकुन आपला दबदबा कायम ठेवला आहे
         यावेळी भांडे क्लासचे मास्टर विवेक भांडे सर यांनी या स्पर्धेत आपले फक्त 25 विद्यार्थी सहभागी केले होते.त्यांनी 31 गोल्ड मेडल, 11 सिल्व्हर, 6 ब्राँझ मेडल असे एकूण 48 मेडल सोबत बेस्ट कराटे टिमची ट्राॅफी जिंकुन मुरबाड मधील भांडे क्लासचा झेंडा फडवल्या बद्दल तालुक्यातील सर्वच स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
             या स्पर्धेत - 
1) स्वारी लक्ष्मण पवार- 2 गोल्ड मेडल,
2) निल अनंत वाळकोळी- -2 गोल्ड मेडल,
3) वेदांत काशिनाथ भोपी-2 गोल्ड मेडल,
4) सर्व तेजस शहा-2 गोल्ड मेडल,
5) आराध्य हितेंद्र कंटे-2 गोल्ड मेडल,,
6) तन्मय रत्नाकर माळी -2 गोल्ड मेडल,
7) आझाद अनिल प्रसाद -2 गोल्ड मेडल,
8) श्रदा अनंत माळी -2 गोल्ड मेडल,
9) वैष्णवी अमित आंबवडे -2 गोल्ड मेडल,
10) भार्गवी रामचंद्र भांडे -2 गोल्ड मेडल,
11) तेजस्वी दिपेंद्र शेखावत,-1 गोल्ड मेडल,
12) ओम रविंद्र म्हात्रे -1 गोल्ड मेडल,
13) कनक तेजस शाह,1 गोल्ड मेडल,                                14) देवराज योगेश कंटे -1 गोल्ड मेडल,
15) स्वराज वैभव सुरोशे - 1, गोल्ड,1 सिल्व्हर मेडल,
16) गणेश सुनील चव्हाण 1 गोल्ड,1 सिल्व्हर मेडल,
17) प्रनित प्रविण कुमार पडवळ 1 गोल्ड,1 सिल्व्हर,
18) प्रणाली गणेश  गवारी,1 गोल्ड,1 सिल्व्हर मेडल,
19) स्रुष्टी मारुती डांगे,1 गोल्ड,1ब्रांझ,
20) हर्ष जीवन वाघचौडे 1 गोल्ड,1 ब्राँझ मेडल,
21) विराज जगदिश सुर्यराव,1 गोल्ड मेडल,
22) अरुणधंती प्रदिप चामियार, 2 सिल्व्हर,
23) गुंजन रजनीकांत काकडे,2 सिल्व्हर मेडल,
24) सार्थक मारुती डांगे,2 ब्रांझ मेडल,
25) ध्रुव प्रदिप चामियार,1 ब्राँझ मेडल, असे एकूण 48 मेडल मिळवून मुरबाड घ्याइ भांडे क्लासच्या झेंडा अटकेपार रोवला गेला असुन, या क्लासचे कोच  मास्टर विवेक भांडे सर व महेंद्र भांडे सर एक उत्तम प्रशिक्षक असल्याचे पालकवर्गातुन बोलले जात आहे. तर भांडे कराटे क्लास हि भविष्यातील नवतरुणांना आत्मसंरक्षणाचे  माफक दरात धडे देणारी एकमेव संस्था असल्याचे सिद्ध झाले असून, विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश आजच नक्की करा असे आवाहन मास्टर महेंद्र भांडे सर व विवेक भांडे सर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...