मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम !!
पुणे, दि. २९ सप्टेंबर : राज्य शासनामार्फत "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा" या कालावधीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या तसेच १२ वी उत्तीर्ण होऊन वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग व शैक्षणिक व समाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (मराठा ) या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
विद्यार्थ्यांनी आपले अर्ज COVIS प्रणाली किंवा www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरून त्याची हार्ड प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आळंदी रोड, पुणे येथे कार्यालयीन वेळेत सादर करावी. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या व अर्ज प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दर बुधवारी व गुरुवारी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून परिपूर्ण प्रकरणात तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती संजय दाणे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे यांनी दिली.
No comments:
Post a Comment