Sunday, 21 September 2025

"भाजप प्रदेशाध्यक्ष श्री.रविंद्रजी चव्हाण" यांच्या वाढदिवसानिमित्त प्रितम म्हात्रेंची सस्नेह भेट !!

"भाजप प्रदेशाध्यक्ष श्री.रविंद्रजी चव्हाण" यांच्या वाढदिवसानिमित्त प्रितम म्हात्रेंची सस्नेह भेट !!

उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष, राज्याचे सन्माननीय मंत्री आणि जनतेचे लाडके नेते नामदार श्री रविंद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जाऊन सस्नेह भेट घेतली. यावेळी प्रितम म्हात्रे यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा गौरव केला.

श्री.रविंद्रजी चव्हाण हे मागील दोन दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी आणि जनसामान्यांशी घट्ट नाळ जोडून काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे, युवकांना राजकारणात संधी उपलब्ध करून देणे आणि सामाजिक कार्यात सहभागी करणे ही त्यांची खास शैली आहे.

सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण व नागरी विकास विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी अनेक भव्य प्रकल्पांना गती दिली आहे. राज्यातील रस्ते, पूल, उड्डाणपूल, जलवाहिन्या आणि गृहनिर्माण योजना यामध्ये त्यांच्या पुढाकारामुळे सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल झाला आहे. विशेषतः ठाणे व नवी मुंबई परिसरातील पायाभूत सुविधा उभारण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

सामाजिक क्षेत्रातही रविंद्रजींचे कार्य तितकेच उल्लेखनीय आहे. शिक्षण क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तर क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना प्रोत्साहन आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, पर्यावरण संवर्धन उपक्रम, वृक्षारोपण मोहीम तसेच महिला बचतगटांना पाठबळ देणे अशा विविध उपक्रमांमुळे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत त्यांनी आपली सेवा पोहोचवली आहे.

कोविड-१९ महामारीच्या कठीण काळात त्यांनी हजारो कुटुंबांना अन्नधान्य व औषधांची मदत केली. स्थलांतरित मजुरांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी पोहोचविण्यापासून ते आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यापर्यंत त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. “जनतेचा माणूस” ही ओळख त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली आहे.

कोट(चौकट ):- 

"श्री.रविंद्रजी चव्हाण यांचे कार्य हे समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारे आहे. त्यांची साधी राहणी, कार्यकर्त्यांशी असलेली नाळ आणि जनतेच्या अडचणींना तत्काळ दिला जाणारा प्रतिसाद यामुळेच ते सर्वांच्या मनात आपलेसे झाले आहेत. त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.”
प्रितम जनार्दन म्हात्रे
विरोधी पक्षनेते 
पनवेल महानगरपालिका.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...