Thursday, 25 September 2025

तहसील कार्यालय अंबरनाथ व भटके विमुक्त सामाजिक संस्था यांचे माध्यमातून शासकीय दाखले मिळविण्यासाठी जनजागृती !!

तहसील कार्यालय अंबरनाथ व भटके विमुक्त सामाजिक संस्था यांचे माध्यमातून शासकीय दाखले मिळविण्यासाठी जनजागृती !!

अंबरनाथ, प्रतिनिधी:
भटके विमुक्त समाजातील विशेष करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळवून घेण्यासाठी आवश्यक असलेलं जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खुप अडचणी येतात, भटके विमुक्त समाजासाठी शासनाकडून विविध स्तरांवर योजना राबविण्यात येतात परंतु आपण त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असणे आवश्यक असते यासाठी भटके विमुक्त सामाजिक संस्था आपली सामाजिक बांधिलकी जोपासत समाजात जनजागृती करून भटके विमुक्त समाजाला शासकीय दाखले मिळविण्यासाठी मार्गदर्शन करते याच अनुषंगाने आज बुधवार दि २४ सप्टेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालय अंबरनाथ येथे समाजबांधवांना शासकीय दाखले मिळविण्यासाठी जनजागृती करून मार्गदर्शन केले.

शासकीय दाखले मिळविण्यासाठी भटके विमुक्त समाजाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कागदपत्रे सादर केली, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मदत करत होते. याप्रसंगी भटके विमुक्त समाजाचे शिष्टमंडळ यांनी मा तहसीलदार साहेब यांना भेटून शासकीय दाखले मिळविण्यासाठी जनजागृती करून उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल आभार व्यक्त केले.

याप्रसंगी भटके विमुक्त  सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे, शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी व्हीजेएनटी अंबरनाथ तालुका प्रमुख परशुराम जाधव, कंजारभाट समाजाचे विनोद तमायचीकर, शेखर अभंगे, कैलास घुमान, विनोद परमार, मुकेश चव्हाण, बहुजन विचार प्रणेते विजय हनुवते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...