Saturday, 27 September 2025

"सिध्दी कातकरने" जिल्हास्तरीय रायफल शुटींग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले...

"सिध्दी कातकरने" जिल्हास्तरीय रायफल शुटींग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले...

** शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या वतिने सत्कार

नालासोपारा, प्रतिनिधी ता, २७ :- नालासोपारातील  सिध्दी बाबुराव कातकर हिने जिल्हास्तरीय महाविद्यालयीन क्रीडा रायफल शुटींग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक आपल्या नावे करत पालघर जिल्हायाचे नाव उज्वल केले आहे. सिध्दी ने यापूर्वीही अनेक स्पर्धांत चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल शिवसेना महिला आघाडी च्या वतिने शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

स्पर्धेदरम्यान सिध्दी ने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, आत्मविश्वास आणि चिकाटी दाखवत प्रतिस्पर्ध्यांना दमदार टक्कर दिली. तिच्या निखळ मेहनतीमुळे व क्रीडाप्रेमामुळेच हे यश मिळाल्याचे तिचे मार्गदर्शक शिक्षक व आई वडिल सांगतात.
या विजयामुळे राष्ट्रीय पातळीवर हि ती दमदार प्रदर्शन करेल, कुटुंबीयांची अपेक्षा आहे. शिवसेना महिला आघाडीच्या वतिने तीचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या पालघर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तुमची ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे. तुमच्या उत्कृष्ट खेळाचे आणि मेहनतीचे हे फळ आहे. या यशाबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करत रूचिता नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटक भाविका छावडा, शाखा संघटक वंदना ढगे जया गुप्ता, भारती कातकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...