राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस निम्मित जीवनदाता सामाजिक संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन !!
मुंबई - निलेश कोकमकर
जीवनदाता सामाजिक संस्था दरवर्षी १ ऑक्टोबर – राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस विशेष उत्साहात साजरा करत असून यंदा सलग १९ व्या वर्षी हा उपक्रम राबवला जाणार आहे. अनेक रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात हसू उमलण्यासाठी निःस्वार्थ रक्तदानाची गरज असते म्हणून सुट्टी असो वा नसो, महिन्याचा पहिला दिवस असो वा कामाचा, या दिवशीच रक्तदान करून समाजासाठी योगदान द्यावे हा संस्थेचा ठाम संकल्प आहे. व्हॅलेंटाईन डे, फ्रेण्डशिप डे अशा दिवसांप्रमाणेच रक्तदान दिवस देखील समाजाने मोठ्या प्रमाणात साजरा करावा, या उद्देशाने जीवनदाता परिवाराची स्थापना झाली.
कोविड काळातील निर्बंध असतानाही रक्तदात्यांनी न घाबरता १ ऑक्टोबरलाच प्रत्यक्ष रक्तपेढीत जाऊन रक्तदान करून हा दिवस साजरा केला होता. यंदाही ही परंपरा पुढे सुरू ठेवत बुधवार, १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत रक्तपेढी, के.ई.एम. रुग्णालय, परेल, मुंबई – ४०००१२ येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. घराजवळच्या शिबिरात रक्तदान करणे अनेकांसाठी सोयीचे असते, परंतु कामाच्या दिवशी लांब जाऊन रक्तपेढीत रक्तदान करणे ही खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी पार पाडावी, असे आवाहन जीवनदाता सामाजिक संस्था तर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क गणेश आमडोसकर – ९८९२७१४१३१ यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment