Saturday, 13 September 2025

उरण तालुका वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नवनियुक्त पोलीस निरीक्षकांची सदिच्छा भेट...

उरण तालुका वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नवनियुक्त पोलीस निरीक्षकांची सदिच्छा भेट... 

उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) :
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजात शांतता नांदावी यासाठी रात्रंदिवस आपले कर्तव्य चोखपणे बजावणारे पोलीस अधिकारी कर्मचारी या देशाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. समाजात जातीय सलोखा, शांतता, समानता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरते. उरण तालुक्यात सर्व जाती धर्माची नागरिक  सुखाने, गुण्या गोविंदाने एकत्र राहतात.उरण मध्ये अनेक विविध राष्ट्रीय प्रकल्प, कंपन्या आहेत. अनेक महत्वाचे कारखाने आहेत, औद‌योगिक परिसर आहे. त्यामूळे येथील पोलिस डोळ्यात तेल घालून रांत्रदिवस चोख कर्तव्य बजावत असतात. अशा उरण सारख्या महत्वाच्या ठिकाणी उरण पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक एच. डी. मुलाणी यांची नियुक्ती झाली. त्यांनी उरण पोलिस ठाण्यात पद‌भार स्विकारला असल्याने सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी झटणाऱ्या व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या उरण तालुका  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उरण पोलीस ठाणे कार्यालयात वरिष्ठ पोलिस निरीक्षक एच डी मूलानी यांचा उरण पोलिस ठाणे मध्ये पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी उरण तालुका पदाधिकारी अध्यक्ष तुकाराम खंडागळे, कोषाध्यक्ष साहेबराव ओहोळ, उपाध्यक्ष तुषार गायकवाड, सदस्य ईश्वर ढोले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...