अभिलेख दडविल्याबद्दल साझा कुंदे ता. कल्याण ग्राम महसूल अधिकारी यांच्या विरोधात आझाद मैदान ह्या ठिकाणी बेमुदत उपोषण !!
कल्याण, प्रतिनिधी - कल्याण तहसीलदार अंतर्गत साझा कुंदे ग्राम महसूल अधिकारी श्रीमती मंजुषा राठोड यांच्या कर्तव्यात असलेले कोलिंब ह्या ठिकाणची फेरफार संचिका ३०२ यांची याची माहिती दडवली तसेच त्यांच्या वरिष्ठांना सदर विषयावर अवलोकीत केले तरी त्यांनी यासंदर्भात कोणतीही दखल घेतली नाही याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी श्रीमती मंजुषा राठोड त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आज दिनांक २९/०९/२०२५ पासून बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आलेली आहे जोपर्यंत कायदेशीर कार्यवाही पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे उपोषण करते प्रकाश पवार यांनी सांगितले आहे.
प्रकाश पवार यांच्या उपोषणासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही तहसिलदार (कल्याण) सचिन वेताळ यांच्याशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. असे दिसते की प्रशासन ग्राम महसूल अधिकारी श्रीमती मंजुषा राठोड यांना पाठीशी घालत आहे.
साझा कुंदे ता. कल्याण ग्राम महसूल अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि जोपर्यंत त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी उपोषण सुरुच ठेवणार - प्रकाश अंकुश पवार
No comments:
Post a Comment