उरण महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न !!
उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालय वाणिज्य विभाग तसेच सेबी (SEBI) यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला.या करीता पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्रा. मकसूद मेमन यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच कोण कोणत्या अधिकृत मार्गाने बचतीची सवय लावावी व आपली प्रगती कशी करावी याची संपूर्ण माहिती प्रा. मेमन यांनी दिली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाल्मीक गर्जे तसेच विभागप्रमुख प्रा. व्ही.एस. इंदुलकर यांनीही विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. प्रा.डॉ. पी.आर.कारुलकर यांनी या कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार मानले यावेळी प्रा. आर. टी. ठवरे प्रा.डॉ.एच.के.जगताप आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment