Monday, 22 September 2025

सामाजिक जिव्हाळा फाऊंडेशन ( रजि.) आयोजित मखर सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर !!

सामाजिक जिव्हाळा फाऊंडेशन ( रजि.) आयोजित मखर सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर !!

मुंबई - ( दिपक कारकर )

कोकण आणि गणपती उत्सव हे एक समीकरण आहे आणि या कोकणामध्ये प्रत्येक वर्षी चातक पक्ष्याप्रमाणे वाट बघणारा गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरामध्ये भक्तीभावाने पूजन करत सुबक आरास सजवत असतो.गणपती हे निसर्गाचच रूप आहे, आणि निसर्ग वाचला तर आपण अजून सुंदर जीवन जगू' असा संदेश देणारा गणराया बाप्पा, म्हणून आपण सर्वांनी लाडक्या बाप्पाला सुबक शैलीत मखर सजवण्याची आवड ही प्रत्येकजण जपत असतो आणि यावर्षी सामाजिक जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे रत्नागिरी जिल्ह्यस्तरीय पर्यावरणपूरक मखर सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.एकूणच संपूर्ण जिल्ह्यातून ५८ स्पर्धकांनी सहभाग घेऊन या स्पर्धेची रंगत आणली होती, या स्पर्धेमधून प्रथम क्रमांक-सुयोग सुरेश गुरव (साखळकोंड संगमेश्वर), व्दितीय क्रमांक-सुशांत माचिवले (माची वलेवाडी रत्नागिरी), तृतीय क्रमांक-अभिषेक शंकर खातू (संगमेश्वर), उत्तेजनार्थ : १)विजय गंगाराम पातडे (असुर्डे संगमेश्वर), २)हर्ष आणि यज्ञ लांबे (आरवली), ३)साईराज विलास गुडेकर (मांडकी खुर्द), ४)ओमकार दत्ताराम बोंडकर (पांग, चिपळूण), ५)रुपेश नांगले (दहिवली), ६)शशिकांत धोंडू निर्मळ (असुर्डे), ७)अनिल बामणे, ८)संदेश अरुण धुमक (असुर्डे चिपळूण), ९)अभिषेक गुडेकर (मांडकी खुर्द) या सर्व स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे, आणि एकूणच या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री दिलीप नाचरे, सचिन मटकर, शैलेश धुमक, दिपक मादगे आणि उदय गावडे यांनी सर्व निकषांचा विचार करून स्पर्धकांच्या कलेला न्याय दिला आहे. या सर्व स्पर्धकांना संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे, सामाजिक जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.शैलेश गायकर यांच्या वतीने सर्वच स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...