नालासोपारा पश्चिम प्रभाग क्रमांक ११ शिवसेना लढणवण्यावर ठाम !!
*** काहीही झालं तरी नालासोपारातील' प्रभाग क्रमांक ११ या जागेवर शिवसेना ठाम ! भाजपसोबत वादाची शक्यता; कितीवर केला दावा? जाणून घ्या.....
नालासोपारा, प्रतिनिधी :- एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना सध्या भाजपसोबत राज्यात महायुती म्हणून सत्तेत आहे. हीच महायुती म्हणून ते वसई विरार महापालिका देखील लढवणार आहेत.
*नालासोपारा पश्चिम मधील प्रभाग क्रमांक ११ या जागेवर शिवसेना ठाम* असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडं भाजपनं देखील जागा लढवणाऱ्या चंगच बांधला आहे. त्यामुळं इथल्या प्रभागांवरुन आता महायुतीतील या दोन पक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
नवीन प्रभाग रचनेनुसार समेळ पाडा उमराळे करमाळा साईनगर श्रीप्रस्था म्हाडा निळेमोरे असा भला मोठा प्रभाग असल्याने यामधे 42 हजार मतदारांची संख्या आहे.
शिवसेनेच्या रुचिता नाईक यांनी आपल्या कामाचा कार्य्हवाल प्रसिद्घ करून निवडणुकीचा आधीच आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या यांच्या शिवसेना पक्षाची बांधणी व जनसंपर्क कार्यालय याच प्रभागातून शिवसेनेच्या महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांनी प्रथम सुरू केले होते. त्यावेळी अनेक पक्षाच्या लोकानी शिवसेना कार्यालय स्थापन करताना दबाव व विरोध केले होते या सर्वांचा विरोध सहन करून पाहिले शिवसेना कार्यालय समेळपाडा येथे उभे केले व पक्षाची बांधणी केली.
अनेक वेळा मारामाऱ्या व केसेस सहन करून नालासोपारा पश्चिम मध्ये शिवसेना घडविण्याचे काम शिवसेना महिला आघाडी चा रुचिता नाईक यांनी केले होते. त्यांनी केलेल्या विविध विकासकामे व नागरिकाचा समस्या सोडविल्याने तसेच १५०० महिलांना मोफत प्रशिक्षण रोजगार विविध शिबीरे महापालिकेची कामे केल्याने या प्रभागातून त्यांचा कामाचा दबदबा आहे .रोज रूग्णांना मोफत रूग्णवाहिका सेवा उपलब्ध होत असल्याने नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या प्रभाग कामे हवी तशी कामे न झाल्या मुळे नागरिक सत्ताधारी बहुजन विकास आघाडी वर नाराज असल्याने याचा फायदा महायुती ला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाविकासआघाडी कडून हि मोर्चे बांधणी करण्यास सुरवात केली असून त्यांना निवडणुक कठीण जाणार असल्याचे बोलले जात आहे.या प्रभागात भाजपकडून बंडखोरी करण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत कडे सर्वांचे लक्ष लागले असून महापालिकेवर कोणाची पकड़ राहते ही बघणाऱ्या सारखे आहे.
No comments:
Post a Comment