सौ.दिपालीताई योगेश्वर जाट "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार-२०२५ ने सन्मानित !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
सौ.दिपालीताई योगेश्वर जाट – समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.समाजासाठी झपाट्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव व्हावा या उद्देशाने सौ.दिपालीताई जाट यांना नुकताच विरार पूर्व येथे "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार-२०२५ देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान जन पहारा मराठी वृत्तपत्र व महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज यांच्या वतीने १७ वा वर्धापन दिन सोहळा – सन २०२५ या प्रसंगी प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासन मंत्रालयाचे अधिकारी श्री.योगेशजी पाटील, समाजसेवक डॉ संजय जाधव, हुमन राईट्स अध्यक्ष व रुग्णसेवक समाजसेवक श्री.नरेश मोरे सर, मा. नगरसेवक अमितजी वैद्य सर, समाजसेवक ब्रिजेश शुक्ला, श्री निलेश तेलंगे, ट्रॅफिक पोलीस पूजा कांबळे मॅडम, पोलीस अधिकारी श्री सावंत साहेब व अन्य सहकारी, पत्रकार श्री. शांताराम गुडेकर, साम टीव्ही श्री.कानडे, अन्य पत्रकार तसेच समाजसेवक श्री. राजेश पोरे सर, कलाकार कोकणी निखिल श्री.निखिल सकपाळ, कलाकार अमोल भाताडे, शाहीर संदेश पालकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते.नालासोपारा डीवाईन स्कुल, विजय नगर येथे स्नेहसंमेलन तथा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
हा पुरस्कार फक्त एक मानांकन नाही,तर समाजकार्याच्या अथक प्रयत्नांचा, निस्वार्थ सेवाभावाचा आणि स्त्रीशक्तीच्या जागृतीचा अभिमान आहे. सौ दिपालीताईनी अनेक वर्षांपासून गरीब,दुबळ्या, वंचित व महिला वर्गासाठी कार्य केले आहे. विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मार्गदर्शन, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हातभार, अडचणीत असलेल्या प्रत्येक घराला आधार हीच त्यांची सेवा आणि समाजासाठीची खरी ओळख आहे.त्यांच्या कार्यात योगेश्वर दादा जाट यांचे खांद्याला खांदा लावून सहकार्य ही प्रेरणा आणि शक्ती बनली आहे. दोघांनी मिळून समाजात ‘सेवा हीच खरी साधना’ही शिकवण रुजवली आहे. तुकाराम महाराज म्हणतात"जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले” या अभंगातल्या ओळींनी रूपालीताईंच्या कार्याचा सार स्पष्ट होतो.दुःखी, उपेक्षित व गरजू माणसांसाठी त्यांनी स्वतःला वाहून दिलं आणि त्यांच्या मदतीमुळे अनेकांच्या जीवनात आशेचा किरण उजळला. या पुरस्काराने सौ. दिपालीताईना फक्त सन्मान नाही, तर समाजातील प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणा आणि संदेश दिला आहे,की कठीण परिश्रम, निस्वार्थ भावना आणि सेवा हाच खरा मार्ग आहे.आजच्या काळात समाजसेवेतील असंख्य कार्यकर्त्यांमध्ये अत्यल्पच लोक या पातळीवर उभे राहतात. पण दिपाली ताई जाट या दुर्मिळ व्यक्तींपैकी आहेत. त्यांचे कार्य केवळ गावापुरते मर्यादित नाही, तर शहरातील आणि परिसरातील प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचते. हा पुरस्कार त्यांच्या आणि योगेश दादांच्या अथक परिश्रमांचा परिणाम आहे. त्यांनी समाजासाठी जे काही केले आहे, ते लक्षात ठेवून व पुढील पिढीला प्रेरणा देणारे ठरले आहे. दिपालीताई जाट व योगेश्वर दादांचे यानिमित्ताने अनेकांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची ही सेवायात्रा उजळत राहो,समाजासाठीच्या कार्यात त्यांचे योगदान अजून बहरत राहो, हीच तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करत त्यांच्या कार्यास अनेकांनी सलाम केला आहे.
No comments:
Post a Comment