Tuesday, 14 October 2025

दि. १७ ऑक्टोबर रोजी बीड येथे होणाऱ्या महाएल्गार सभेला शिवा संघटनेचा जाहीर पाठिंबा !!

दि. १७ ऑक्टोबर रोजी बीड येथे होणाऱ्या महाएल्गार सभेला शिवा संघटनेचा जाहीर पाठिंबा !!

** मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन.

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) : शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्यभर ठिक-ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेवुन लढा उभारला जात आहे. त्याचाच भाग म्हणून दि.०२ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या ओबीसीवर अन्याय करणारा शासन निर्णयाविरोधात दि. ०८.०९.२०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात शिवा संघटनेच्या वतीने पहीली याचिका दाखल केली आहे. एवढेच नाहीतर ज्या आझाद मैदानावर २ सप्टेबरचा जी.आर देण्यात आला त्याच आझाद मैदानावर अन्याय करणारा जी. आर रद्द करण्यासाठी शिवा संघटनेच्या वतीने दि. ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रचंड धरणे आंदोलन करण्यात आले. याच धरणे आंदोलनाच्या व्यासपीठावरुन ओबीसीचे संघर्ष योध्दे व मंत्री मा. ना. छगनराव भुजबळ यांनी पावसामुळे रद्द झालेल्या बीड येथील ओबीसीच्या महाएल्गार सभेची घोषणा केली दि. १७ ऑक्टोबरला ही महाएल्गार सभा ओबीसी नेते मा. ना. छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली घेण्याचे जाहीर केले आहे. या महाएल्गार सभेला शिवा संघटनेसह मराठवाडयातील संपूर्ण ओबीसी समाजाचा जाहीर पाठिंबा आहे.

तरी मराठवाडयातील शिवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व वीरशैव लिंगायत समाजबांधवासह संपुर्ण ओबीसी समाजबांधवानी शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण, छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...