Thursday, 30 October 2025

प्रशिक्षित कुर्मी पुरोहित अंधश्रद्धा बाजूला सारून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतील !!

प्रशिक्षित कुर्मी पुरोहित अंधश्रद्धा बाजूला सारून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतील !!

* कुर्मी महासभेचे राष्ट्रीय संरक्षक एल.पी.पटेल यांचे प्रतिपादन

(वाडा/दि.30 ऑक्टोबर) :

सध्याचे जग सर्व बाबतीत पुढारलेले असताना आपल्या समाजात आजही काही चुकीच्या प्रथा व अंधश्रद्धा आढळून येत आहेत. कुर्मी महासभेच्या माध्यमातून प्रशिक्षित झालेले पुरोहित हे समाजातील कुप्रथा व अंधश्रद्धा दूर करून समाजाला योग्य  समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतील, असा विश्वास कुर्मी महासभेचे राष्ट्रीय संरक्षक एल.पी.पटेल यांनी व्यक्त केला आहे.

अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्यावतीने वाडा तालुक्यातील मेट येथे पुरोहित सात दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप गुरुवार (दि. 30 ऑक्टोबर) रोजी पार पडला. 

तर प्रशिक्षित पुरोहित महिला या आपल्या परिवारासाठी व समाजासाठी एक आदर्श मार्गदर्शिका ठरतील, त्यामुळे समाजातील जास्तीजास्त महिलांनी पुरोहित कार्यासाठी पुढे यावे, असे आवाहन कुर्मी महासभेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा लताऋषी चंद्राकर यांनी केले आहे. 

या समारोप कार्यक्रमासाठी ओएनजीसीचे महाप्रबंधक जनार्दन पटेल, कुर्मी महासभेचे कुर्मी महासभेचे सांस्कृतिक राष्ट्रीय अध्यक्ष  शाहीर गायकर, प्रदेश अध्यक्ष संजय पाटील, प्रदेश महासचिव जयेश शेलार, पुरोहित प्रशिक्षक डॉ. रज्जन प्रसाद पटेल, प्रदेश संरक्षक डॉ. बाबुलाल सिंह, ॲड. गोपाळ शेळके, किसन बोंद्रे, अजित राऊत, नरेश आकरे, डॉ. राममूर्ती वर्मा, व्ही. के. वर्मा, ज्येष्ठ समाज नेते आप्पा घुडे, महासभेचे कोकण अध्यक्ष तुकाराम पष्टे, उद्योग महासभा प्रदेश अध्यक्ष समीर पाटील, सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती मंडळ अध्यक्ष यदुनाथ पाटील, नाशिक जिल्हा अध्यक्ष निवृत्ती न्याहारकर, रायगड जिल्हाध्यक्ष प्रकाश चांदीवडे, ठाणे शहर कुणबी मंडळ अध्यक्ष पी. एन.पाटील, पुरोहित प्रशिक्षक विजय दळवी, जिल्हा उपाध्यक्ष विजय राव, उद्योजक काशिनाथ पाटील, सचिव सीताराम पाटील, मोहन पाटील, सुभाष पाटील यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या समारोप कार्यक्रमात शिबिरात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तर यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती साजरी करण्यात आली. 

यावेळी कुर्मी पुरोहित महासभेच्या कोकण अध्यक्ष पदावर विजय दळवी, कुर्मी महासभेच्या पालघर जिल्हाध्यक्ष पदावर यदुनाथ पाटील, जिल्हा महासचिव पदावर जयंता पाटील तर तालुका महासचिव पदावर किशोर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासचिव जयेश शेलार यांनी तर आभारप्रदर्शन कोकण अध्यक्ष तुकाराम पष्टे यांनी केले.
-------------------------------
प्रतिक्रिया 
१) कुर्मी महासभा आयोजित पुरोहित प्रशिक्षण शिबिरात 55 समाजबांधवांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून यापुढेही त्यांना तज्ञांचे मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था केली जाईल.
-- जयेश शेलार पाटील
(शिबिर संयोजक तथा प्रदेश महासचिव)

२) शिबिरात उत्तम व्यवस्था होती, तर शिबिरात तज्ञ प्रशिक्षक मिळाल्याने सर्व प्रशिक्षण घेणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून आम्ही प्रामाणिकपणे पौरोहित्य कार्य करू.
-- रामदास घरत (प्रशिक्षणार्थी, कर्जत)

3) अशा प्रकारचं पुरोहित प्रशिक्षण महाराष्ट्रात प्रथमच झाले असून विशेष म्हणजे यामध्ये महिलांना समाविष्ट करून घेतल्याने यापुढे कुणबी समाजातील महिला पुरोहित तयार होणे, ही नवी क्रांती असेल.
-- श्रीमती संध्या पाटील
(प्रशिक्षणार्थी, आबिटघर)

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...