दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेच्या १४ खेळाडूंची राज्यस्तरावर निवड !!
वाटद खंडाळा येथे झालेल्या जिल्हा असोसिएशन सब ज्युनियर डॉजबॉल जिल्हास्तरीय निवड चाचणी मध्ये दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेच्या ८ मुलांची आणि ६ मुलींची एकूण १४ विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. त्यामध्ये दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेच्या कुमारी नंदिनी रवींद्र जाधव, धनश्री नारायण बळकटे, अक्षरा विनोद झर्वे, अन्वया निलेश पावरी, सई देवचंद्र पावरी आणि श्रुतिका सुरेश निवेंडकर या मुलींची तसेच कुमार रुद्र महेंद्र जाधव, श्रवण मनोज जाधव, पूजन रमेश धातकर, वेदांत सहदेव धातकर, आरव अविनाश जाधव, ऋग्वेद मोरेश्वर झर्वे, शुभम विनोद जाधव आणि प्रेम मोहन पवार अशा ८ मुलांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. प्रती वर्षाप्रमाणे राज्यस्तरावर धडकण्याची दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेने परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धा दि. २६, २७ आणि २८ ऑक्टोबर २०२५ ला पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे पार पडणार आहेत. आणि या स्पर्धामधुन निवडक विद्यार्थ्याना राष्ट्रीय स्तरावर निवड होण्याची संधी मिळणार आहे. या प्रशालेचे, मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी क्रीडा शिक्षिका ऋतुजा जाधव मॅडम व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच मुस्लिम एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष रहीम व सर्व पदाधिकारी, सदस्य यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
वृत्तांत - विलासराव कोळेकर सर
No comments:
Post a Comment