जळगाव जिल्ह्यात केळी निर्यातीसाठी मोठी संधी : रवींद्र माणगांवे, अध्यक्ष
जळगाव जिल्ह्यात शेतीपूरक उद्योग उभारणीस मोठी संधी : संगिता पाटील, उपाध्यक्षा
जळगाव, प्रतिनिधी : 'जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे केळी निर्यातीसाठी मोठी संधी उपलब्ध असून, त्यासाठी आवश्यक इको सिस्टीम उभारणे काळाची गरज आहे. या दिशेने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरतर्फे मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल, असे मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र माणगांवे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर जळगाव जिल्हातर्फे नव निर्वाचित अध्यक्ष श्री. रविंद्र माणगांवे यांचा सत्कार व जळगाव जिल्ह्यातील उद्योग व व्यापार वृद्धीविषयक अपेक्षा, मार्गदर्शन, चर्चासत्र शनिवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी हॉटेल रॉयल पॅलेस, जळगाव येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. माणगांवे म्हणाले की, ''जिल्ह्यातील प्रत्येक गावातून किमान पाच व्यक्ती उद्योग सुरू करण्यासाठी निवड करावी. त्यापैकी एक व्यक्ती जरी यशस्वी उद्योग उभा करू शकली, तरी जिल्ह्यात हजारो नवे उद्योजक निर्माण होऊ शकतात. उद्योग स्थापनेसाठी इच्छुक तरुणांना चेंबरच्या माध्यमातून आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाईल.'' ते पुढे म्हणाले की, ''देश महासत्ता व्हायचा असेल, तर लघुउद्योग आणि उद्योजकांना शासन व समाजाने पोषक वातावरण तयार करून द्यावे. उद्योग क्षेत्राचा पाया मजबूत झाला, तर आर्थिक विकासाचा वेगही वाढेल.''
महाराष्ट्राच्या सर्व उद्योजकांच्या अडचणी वर मात करण्यासाठी सर्व विभागांचा विचार करून एक ब्लु प्रिंट तयार करण्याची गरज आहे, जळगाव विभागाचा विचार केला असता फक्त तीन ते चार वर्षाच्या एवढ्या कमी कालावधीत मागच्या दहा वर्षाच्या कालावधी चे कामाची बरोबरी उपाध्यक्षा संगीता पाटील यांनी करून दाखविले आहे असे ठाम मत विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी मांडले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे कार्य गेल्या तीन ते चार वर्षांपासून जळगाव शहरात सक्रियपणे सुरू झाले आहे. तालुकास्तरावर चेंबरची पोहोच वाढल्यामुळे सदस्यसंख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. जळगाव जिल्हा शेती व्यवसायासाठी प्रसिद्ध असून, आगामी काळात शेतीपूरक उद्योग उभारणीस मोठ्या संधी उपलब्ध आहेत, जळगाव जिल्ह्यातील उद्योग व व्यापार क्षेत्राच्या विकासाविषयी मार्गदर्शन करताना, जळगावमध्ये डाळ मिल ,चटई आणि विविध लघुउद्योग कार्यरत आहेत. वाहतुकीच्या सोयी आणि चांगल्या कनेक्टिव्हिटी असूनही औद्योगिक विकास अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. नवीन उद्योजकांना MIDC मध्ये जागा उपलब्ध नाहीत त्या साठी नवीन एमआयडीसी मान. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी MACCIA अंतर्गत जळगाव जिल्हा परिषद मध्ये नवीन जागे साठी घोषणा केल्यानुसार नवीन MIDC उभारणीसाठी पुढाकार घेण्यात येत आहे. तसेच, जिल्ह्यात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने एक्सपोर्टसाठी मोठी क्षमता आहे व ''गोल्ड सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून जळगाव शहराचा सर्वांगीण विकास साधता येईल. चेंबरतर्फे बिझनेस फोरम सुरू करण्याचे नियोजन असून, याचा विविध उद्योगांना निश्चितच फायदा होईल,'' असे प्रतिपादन चेंबरच्या उपाध्यक्षा संगिता पाटील यांनी केले. मासिआ विश्वस्त मंडळ चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्षा संगिता पाटील, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, राष्ट्रीय समन्वयक वेदांशू पाटील, गव्हर्ननिंग कौन्सिल मेंबर श्री. दिलीप गांधी आदी यावेळी व्यासपीठार उपस्थित होते.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील जिंदा अध्यक्ष रवींद्र लढढा, लघुउद्योग भारतीचे सचिव सचिन चोरडिया, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष शाम अग्रवाल, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल झंवर, चोपडा औद्योगिक वसाहतीचे संजय जैन, उद्योगपती, व्यापारी, कृषी क्षेत्रातील प्रतिनिधी, तसेच चेंबरचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गर्व्हनिंग कौन्सिल सदस्य श्री. अश्विनकुमार परदेशी, श्री.धनराज कासट यांनी सहकार्य केले, तर गर्व्हनिंग कौन्सिल सदस्य श्री. महेंद्र रायसोनी, श्री. अरविंद दहाड, श्री. विनोद बियाणी, श्री किरण बच्छाव, समन्वयक राहुल बैसाणे आदीनीं परिश्रम घेतले. श्री दिलीप गांधी यांनी सर्वांचे स्वागत केले. श्रीमती सरिता खचणे यांनी सूत्रसंचालन व श्री.अरविंद दहाड यांनी आभार मानले.
श्री राहुल बैसाणे - 8485086714
समन्वयक, मसिआ, जळगाव.
No comments:
Post a Comment