उरण महाविद्यालयाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत !!
उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) :
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व माजी विद्यार्थी संघ,आर्ट ऑफ लिविंग,मी उरणकर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी पहाट हा कार्यक्रम मागील पंचवीस वर्षापासून आयोजित केला जातो. विकासापासून वंचित असलेल्या समाज घटक दिवाळी सारखा महत्त्वाचा सण आनंदाने साजरा करू शकत नाहीत त्यामुळे दिवाळीत त्यांच्या आनंदाचा भाग व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो. यावर्षी पुनाडे आदिवासी कातकरी वाडी येथील बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाल्मीक गर्जे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी व समाजाप्रती आपलेही काही कर्तव्य आहे ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी तसेच आदिवासी बांधवांचे जीवन विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला असेच प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य के. ए.शामा यांनी याप्रसंगी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी या उपक्रमाचा इतिहास सांगितला व विद्यार्थ्यांनी सेवाभावी वृत्ती अंगीकारून मार्गक्रमण केले पाहिजे असे प्रतिपादन केले तसेच माजी विद्यार्थी व महाविद्यालयाने ही परंपरा टिकून ठेवावी असे सांगितले. याप्रसंगी पुनाडे आदिवासी कातकरी वाडी वरील महिलांना एकूण बारा वारी साडी २२, सहावारी साडी ६०, पुरुषांना ८० टॉवेल्स, व एकूण ५० विद्यार्थ्यांना कपडे व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी तयार केल्या दिवाळी फराळ व गोड पदार्थ आदिवासी बांधवांना दिला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेकांनी आर्थिक मदत केली त्यामध्ये प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे, माजी प्राचार्य के.ए.शामा, टी एन घ्यार, विशाल पाटेकर, रोहित पवार, तेजस आठवले, प्रेरणा पाटील, डॉ. दत्ता हिंगमिरे, डॉ. अरुण चव्हाण, प्रा. व्हि एस इंदुलकर, प्रा.डॉ.पराग कारुलकर, डॉ. एम.जी.लोणे, डॉ. एच.के.जगताप, एस वाय बी कॉम विद्यार्थी, इतर शिक्षक अशी एकूण जवळपास ८५००० च्या आर्थिक मदतीच्या सहाय्याने कार्यक्रम यशस्वी केला गेला. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विशाल पाटेकर, रोहित पवार, तेजस आठवले, मंगेश म्हात्रे, अनिल पवार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment