Wednesday, 29 October 2025

प्रकाशयात्री : डॉ. मुरहरी केळे' या गौरव ग्रंथाचे कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रकाशन' !!

प्रकाशयात्री : डॉ. मुरहरी केळे' या गौरव ग्रंथाचे कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रकाशन' !!

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ धनगर समाज अधिकारी संघ, पुणे आयोजित एका सहृदय सत्कार सोहळा आणि 'प्रकाशयात्री : डॉ. मुरहरी केळे' या गौरव ग्रंथाचे प्रकाशन आयोजित करण्यात आले होते. सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्याचे अभ्यासक व ऊर्जा क्षेत्रातील तज्ञ डॉ. मुरहरी केळे यांचे कार्यकर्तृत्वावर आधारित गौरव ग्रंथाचे संपादन श्री. दत्ता किवणे व श्री. शिवाजी तिकांडे यांनी केले होते. त्याचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या हस्ते दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथे करण्यात आले.
सदर गौरव ग्रंथावर प्रमुख भाष्यकार आणि इतिहास तज्ञ असलेले भारत महाविद्यालय, जेऊर येथील प्रा. डॉ. शिवाजीराव वाघमोडे यांनी समयोचित व अभ्यासपूर्ण भाष्य केले. पुस्तकावर भाष्य करताना डॉ. वाघमोडे यांनी पुस्तकातील अंतरंग उलगडून दाखवतांना ग्रंथातील डॉ. केळे यांनी लिहिलेले निवडक लेख, डॉ. केळे यांच्या बद्दल अभ्यासकांनी लिहिलेले लेख, डॉ. केळे यांची साहित्य संपदा, तसेच डॉ. केळे यांच्या आयुष्यपट उलगडून दाखवणारी निवडक छायाचित्रे, तसेच त्यांचा सविस्तर बायोडाटा असे असलेले, सुंदर मुखपृष्ठ, मलपृष्ठावर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री. रवींद्र शोभणे यांची पाठराखण असलेले पुस्तक अतिशय सुंदर आणि डॉ. केळे यांचे लौकिकाला साजेसे झाले आहे, असे मत व्यक्त केले.

सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात धनगर समाजातील प्रथमच कृषी मंत्री झालेल्या व शेतकऱ्यांसाठी चांगली कामगिरी करत असलेल्या श्री दत्तात्रय भरणे यांचा सहृदय सत्कार सोहळा व विविध वीज कंपन्यातील उच्च पदावर निवड झालेले अधिकारी श्री. अभय भरणे, श्री. दत्तात्रय पडळकर, श्री. धर्मराज पेठकर, श्री. संदीप हाके व श्री. अतुल सोनजे त्यांचाही सत्कार करण्यात आला. सदर सत्कार महाराजा यशवंतराव होळकर यांचा पुतळा, खांद्यावर घोंगडी, डोक्याला पिवळा फेटा व एक पुस्तक देऊन करण्यात आला. सदर सत्काराला उत्तर देत सत्कारमूर्ती अधिकारी व मंत्रीमहोदय श्री. दत्ता भरणे यांनी समयोचित भाषणे केले. कृषिमंत्री आपल्या भाषणात म्हणाले, समाजातील अधिकाऱ्याने आपापल्या क्षेत्रात काम करत असताना समाजाची सेवा करण्याची पुण्य प्राप्त करून घ्यावे, तसेच उत्तरोत्तर असेच यश संपादन करावे असे सांगितले.

प्रकाशित गौरवग्रंथावर भाष्य करत असतांना डॉ. मुरहरी केळे यांनी संपादकाचे व भाष्याकाराचे आभार मानले. पुढे आपल्या भाषणात श्री केळे यांनी सांगितले की, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्यावरील चित्रपटाचे संहिता लिहून झाली असून तो चित्रपट समाजातील व्यक्तींच्या सहकार्यानेच पूर्ण व्हावा व त्यासाठी सत्तापक्षात असलेले मंत्री, पदाधिकारी व आपले कृषिमंत्री श्री दत्ता भरणे यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्याला उत्तर देताना श्री भरणे यांनी डॉ. केळे यांचेवरील गौरवग्रंथाचे कौतुक तर केलेच परंतु डॉ. केळे यांच्या उत्तुंग कार्याची मी दखल घेतली असून आम्ही यापुढे तुम्हाला विसरणार नाही, असेही हसत हसत सांगितले, तसेच चित्रपट पूर्ण करण्यासाठी मी स्वतः व शासन स्तरावर नक्की सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. ज्ञानदेव पडळकर, श्री. युवराज सरग, श्री. विजय गुलदगड, श्री.धनंजय गावंडे यांचे सह पुणे, बारामती, नाशिक व जवळपासच्या जिल्ह्यातून आलेल्या सर्व समाज बांधवातील अभियंते व अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

वृत्तांत - विलासराव कोळेकर सर 

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...