विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात 29 नोव्हेंबर रोजी ‘व्हिजिट माय पोलीस स्टेशन’ उपक्रम !!
कल्याण दि.२९ नोव्हेंबर :
पोलीस अधिकारी आणि पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनामध्ये असणारी अनावश्यक भिती कमी करण्यासह समाजातील पोलिसांबद्दलचे नकारात्मक चित्र बदलण्याच्या उद्देशाने आज २९ नोव्हेंबर २०२५ रोजी कल्याण पूर्व येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात "व्हिजिट माय पोलीस स्टेशन" उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरीकांना पोलीस ठाण्याची माहिती, येथील कार्यपद्धती आणि इतर महत्वाची माहिती देण्यात आली.
हा उपक्रम विठ्ठलवाडी पोलिस स्टेशन चे *वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.अशोक कोळी साहेब* ह्यांचा तर्फे *व्हिजिट माय पोलीस स्टेशन* या अभियानाच्या अंतर्गत राबविण्यात आला. दरम्यान याचा प्रमुख उद्देश पोलिस तसेच जनतेमध्ये चांगला संवाद निर्माण व्हावा, जनतेच्या समस्यांचे त्वरित निवारण करणे, पोलिसांच्या कामाच्या पद्धतीची माहिती देणे, तसेच जनतेला भारतीय कायद्याची माहिती देऊन जागरूकता वाढवणे. येणाऱ्या आगामी सण उत्सव यासाठी पोलिस आणि जनतेमध्ये समन्वय साधणे. हे सदर अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट होते... वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा.अशोक कोळी साहेब, गोपनीय कक्ष पोलिस हवालदार दिनेश शिर्के साहेब,पोलिस हवालदार चेतन खांबेकर साहेब ह्यांनी अतिशय नम्रपणे व कायदेशीर कारवाई पासून जनतेने कसे सतर्क राहून कायदा सुव्यवस्था न बिघडवता कायद्यात राहून कसे चालावे ह्याची चांगली माहिती दिली..
यावेळी बहुसंख्येने विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शालेय शिक्षण विभाग, समाजसेवक, नगरसेवक, पत्रकार, व्यापारी आदि अभियान मध्ये उपस्थित होते..
तसेच सुभाष टेकडी, उल्हासनगर ४ येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा संरक्षणासाठी तेथील पोलिस चौकी चालू करण्याची मागणी केली व ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने पोलिस पेट्रोलिंग वाढवावी ही विनंती केली...
यावेळी *भारतीय मानवाधिकार परिषद उल्हासनगर शहर अध्यक्ष - अभिजित भाऊसाहेब चंदनशिव, अध्यक्षा - विनीता वाघ,पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रमोदजी टाले,वंचित बहुजन उल्हासनगर शहर महिला अध्यक्षा - रेखाताई उबाळे,उल्हासनगर शहर पूर्व उपाध्यक्ष - महेंद्रजी अहिरे,महिला उपाध्यक्ष - वंदनाजी अवचार,धम्मउपासिका - लताजी पडघाण* उपस्थित होते..
No comments:
Post a Comment