Monday, 17 November 2025

पांडुरंगाच्या साक्षीने पत्रकार मंगल डोंगरे यांचा राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्काराने गौरव !!

पांडुरंगाच्या साक्षीने पत्रकार मंगल डोंगरे यांचा राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्काराने गौरव !!

ठाणे, प्रतिनिधी : व्हॉईस ऑफ मिडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे दिनांक १५ नोव्हेंबर २०२५  व १७/११/२०२५  रोजी चौथे राज्य शिखर अधिवेशन पंढरपूर येथे पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बंधु या अधिवेशनासाठी उपस्थित होते.

याप्रसंगी संघटनेसाठी अमूल्य वेळ देऊन संघटना वाढीसाठी विशेष कामगिरी बजावणाऱ्या राज्यातील पाच उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष व पाच तालुका अध्यक्ष यांचा राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. त्यात कोकण - मुंबई  विभागातून ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा व्हॉईस ऑफ मिडिया चे ठाणे जिल्हा सुप्रीमो मंगल डोंगरे यांना ही राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

मंगल डोंगरे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून त्यांचे अतिशय चांगले असे संघटन कौशल्य, दांडगा अनुभव, समाजातील परिचय, परोपकाराची भावना, तसेच पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी असलेली तत्परता, त्यांच्या ह्या  गुणांमुळे आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.तर आज प्रत्यक्षात दस्तुरखुर्द महोदय राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या शुभ हस्ते अत्यंत मानाचा व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाच्या पंढरपुरात उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष म्हणून पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...