Saturday, 15 November 2025

प्रचिती गायकर हिला राज्यस्तरीय बालचित्रकार पुरस्कार जाहीर !!

प्रचिती गायकर हिला राज्यस्तरीय बालचित्रकार पुरस्कार जाहीर !!

विरार (पालघर) : दि.१४ नोव्हेंबर : शिक्षकांचे व्यासपीठ असलेल्या शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाईन चित्रकला स्पर्धा – २०२५’ या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल आजच्या बालदिनी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत 'अ' गटात (इयत्ता पहिली ते पाचवी) विरार येथील नरसिंह गोविंदराव वर्तक इंग्लिश मीडियम हायस्कूलची विद्यार्थिनी प्रचिती गायकर हिला राज्यस्तरीय बालचित्रकार पुरस्कार प्राप्त झाला. सलग दुसऱ्या वर्षी तिला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी तिला आई कल्याणी गायकर यांचे मार्गदर्शन लाभले. पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता.

     या स्पर्धेसाठी नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव येथील कलाशिक्षक देविदास हिरे आणि जि. प. शाळा, सोड्डी येथील शिक्षक अमित भोरकडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रचितीच्या या यशाबद्दल शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार, शाळा व चित्रकला शिक्षक यांनी प्रचितीचे अभिनंदन केले असून परिसरात तिचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...