नागरी संरक्षण दल, क्षेञ-१, बृहन्मुंबई समूह ठाणे यांच्या वतीने आयोजित नागरी संरक्षण क्षमता, बांधणी व विकास (ToT) पाठ्यक्रम क्र.०६/२०२५ या प्रशिक्षणाचा समारोप संपन्न !!!
बृहन्मुंबई प्रतिनिधी : ता . 30, मा. संचालक, नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार उपनियंञक, नागरी संरक्षण दल, क्षेञ-१, बृहन्मुंबई अंतर्गत, मा.अतिरिक्त नियंञक, नागरी संरक्षण, बृहन्मुंबई यांच्या आदेशाने व उपनियंञक श्री.विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १८ ते २५/११/२०२५ या कालावधीत सकाळी १०.०० ते १७.४५ या वेळेत AIKC D.Ed, B.Ed. काॅलेज खिलाफत हाऊस, भायखळा पोलिस स्टेशनजवळ, मुंबई येथे Capacity Building of CD Volunteer Course No. 06/2025 हा एकूण 30 स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण सुरु करण्यांत आला होता.
प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी श्री. धर्मेंद्र जाधव (सउनि), मास्टर ट्रेनर व मुख्यक्षेञरक्षक, बृहन्मुंबई श्री.रविंद्र वाडेकर यांनी विविध विषयांवरील व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली. तसेच स्वयंसेवकांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.
समारोप कार्यक्रमास उपनियंत्रक श्री. विजय जाधव यांच्यासह महाविद्यालयाच्या प्राचार्य, उपप्राचार्य, इतर विभाग प्रमुख, मुख्यालय मधिकारी श्री.शहेजाद लाहेरी, अग्नी सुरक्षाचे श्री.समीर झा व त्यांची संपुर्ण टीम, विभागीय क्षेत्ररक्षक श्री. रफीक शेख, श्री.नसीर सय्यद अब्बास, सामाजिक कार्यकर्ते इमरान मुल्ला, शायना, स्वयंसेविका प्रिती काटवटे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. उपनियंत्रकांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून पुढील कार्यासाठी प्रेरित करुन नागरी संरक्षणच्या स्थानिक, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध प्रशिक्षण पाठ्यक्रमात सहभागी व्हावे व इतरांना सुद्धा नागरी संरक्षण दलात सामील होण्यांस प्रवृत्त करावे असे आवाहन केले.
👍❤️💞✌️🇮🇳🌍
ReplyDelete