Thursday, 18 December 2025

रविवारी ठाण्यात रंगणार नाट्यजल्लोष !!

रविवारी ठाण्यात रंगणार नाट्यजल्लोष !!

ठाणे, दि. १८,

दिवंगत श्रेष्ठ नाटककार रत्नाकर मतकरींच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वंचितांच्या रंगमंचावर येत्या रविवारी २१ डिसेंबरला रत्नाकर मतकरी स्मृती नाट्यजल्लोषाचे १२ वे पर्व रंगणार आहे. समता विचार प्रसारक संस्था आणि बालनाच्य यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम ठाणे मेंटल हॅास्पिटल जवळील दादा कोंडके खुला रंगमंच येथे संध्याकाळी ४ वा. होणार आहे.

ठाणे शहरातील रमाबाई आंबेडकर नगर, मानपाडा, किसन नगर, राबोडी, कळवा आदि विभाग आणि घणसोली, केवाणी-दिवे अशा आसपासच्या गावातील अनेक वस्त्यांमधून व शाळांमधील वंचित समाजातील मुली मुले ‘बदलते शहर’ या थीमवर आधारित त्यांनीच लिहिलेल्या, त्यांनीच बसवलेल्या आणि अभिनय, नेपथ्य, संगीत हे सगळं त्यांनीच केलेल्या नाटिका सादर करणार आहेत. बदलत्या शहराबरोबरच माणसांमध्ये होत असलेले सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि इतर घटकांमधले बदल आणि त्याबद्दल तरुणाईच्या मनात उठणारी स्पंदने या नाटिकांमधून व्यक्त केली जाणार आहेत, असे नाट्यजल्लोषच्या संयोजिका सुप्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका हर्षदा बोरकर यांनी सांगितले. 

सुप्रसिद्ध रंगकर्मी व लेखिका सुप्रिया विनोद उपस्थित राहून या नाटिकां मधील वैशिष्ट्यपूर्ण लेखन, अभिनय, सादरीकरण आदींना विशेष पुरस्कार देणार आहेत. प्रसिद्ध रंगकर्मी चिन्मयी सुमीत, दिपक राजाध्यक्ष, विजू माने, उदय सबनिस, मकरंद जोशी  आदींना; या कार्यक्रमास उपस्थित राहून लोकवस्तीतील होतकरू युवा कलाकार - कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निमंत्रित केले आहे. सर्व संवेदनशील रसिक ठाणेकरांनी या कार्यक्रमाला जरूर यावे आणि लोकवस्तीतील मुली - मुलांच्या कलाकारीला प्रोत्साहन द्यावे, आवाहन समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले आहे.

मीनल उत्तुरकर
विश्वस्त, समता विचार प्रसारक संस्था 
9833113414

No comments:

Post a Comment

रविवारी ठाण्यात रंगणार नाट्यजल्लोष !!

रविवारी ठाण्यात रंगणार नाट्यजल्लोष !! ठाणे, दि. १८, दिवंगत श्रेष्ठ नाटककार रत्नाकर मतकरींच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वंचितां...