Saturday, 4 April 2026

जि प प्राथमीक कन्या शाळा कळमडू तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव‌ येथे अभिजात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम संपन्न....

जि प प्राथमीक कन्या शाळा कळमडू तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव‌ येथे अभिजात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम संपन्न.... 

चाळीसगाव, प्रतिनिधी : चाळीसगाव तालुक्यातील जि प प्राथमिक कन्या शाळा कळमडू येथे अभिजात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम झाला यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदर्श समाजसेवक पुरस्कार प्राप्त श्री. युवराज बच्छे यांनी अभिजात मराठी भाषा, तिचे संवर्धन आणि जतन कसे करायचे याविषयी मार्गदर्शन केले. मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी शाळेत शिकायला या असे श्री. बच्छे सर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांच्यावर एक सुंदर कविता सादर केली. शाळेला कवी कुसुमाग्रज यांची प्रतिमा भेट दिली. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.प्रल्हादराव चिंचोले सर यांनी श्री युवराज बच्छे यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सौ संगीता सोनवणे मॅडम होत्या शिक्षिका सौ रत्नप्रभा पाटील ,श्री प्रल्हादराव चिंचोले सौ कल्पना चिंचोले श्री दीपक सनेर , श्रीमती गजश्री पाटील ,सौ प्रियंका खलाणे मॅडम यांनी युवराज बच्छे सरांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

मुरबा गणपती भक्तांसाठी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे दुसऱ्या पॅसेंजर बोटीचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते लोकार्पण !!

मुरबा गणपती भक्तांसाठी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे दुसऱ्या पॅसेंजर बोटीचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते लोकार्पण !! भक्तीचा आणि सुरक्ष...