Saturday, 18 April 2026

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या संपन्न !!

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या संपन्न !!

दैनिक बातमीदार प्रतिनिधी : ता. १८, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत मा.श्री.विजय जाधव, उपनियंञक, नागरी संरक्षण यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली दि. ०६ ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत दररोज दु. १३.०० ते सायं. १७.३० या वेळेत ना.सं. प्रशिक्षण हॉल, कल्याण कार्यालय, जि. ठाणे येथे प्राथमिक पाठ्यक्रम प्रशिक्षण वर्ग क्र. ०८/२०२६ यशस्वीरित्या पार पडला. सदर प्रशिक्षणामध्ये एकूण ४३ प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला.

   
    प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी श्री.अनिल गावित, सहाय्यक उपनियंत्रक यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करत व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली. प्रशिक्षणार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली असून त्यांच्या ज्ञान व कौशल्यांचे मूल्यमापन करण्यात आले.

     तसेच, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या स्वयंसेवकांना नागरी संरक्षण कार्यासाठी शपथ देण्यात आली. या प्रशिक्षणामुळे स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार व नागरी संरक्षणाच्या विविध बाबींविषयी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.

     सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला असून त्यासंबंधित छायाचित्रे वरिष्ठांना माहितीसाठी सविनय सादर करण्यात आली आहेत.

– DCCD, NMC, ठाणे

सौजन्य - विश्वनाथ राऊत सर 

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या संपन्न !!

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या संपन्न !! दैनिक बातमीदार प्रतिनिधी : ता. १८, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह ठा...