मुंबई (प्रतिनिधी) – मुंबई मराठी युवा पत्रकार संघ, मुंबई आदर्श फाउंडेशन व ओमकार अकॅडमी ऑफ आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान जागरण परिषद – २०२६ या राज्यस्तरीय सोहळ्यात समाजसेवक व पत्रकार विशाल कुरकुटे यांना “भारतरत्न गौरव श्री” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार शिवश्री काझी सोहेल यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. काझी सोहेल हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वरिष्ठ वकील घराण्यातील शिवश्री काझी हैदर यांचे १३ वे वंशज असल्याचे सांगण्यात आले.
समाजकार्य व पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन विशाल कुरकुटे यांना हा सन्मान देण्यात आला. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला नवचैतन्य मिळणार असून समाजात प्रेरणादायी संदेश पोहोचणार आहे. कार्यक्रमास विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment