Tuesday, 14 April 2026

उरण महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !!

उरण महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !!

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) : ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला, महिलांना त्याचे स्वातंत्र्य व अधिकार मिळाले,दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला अशा महान थोर समाज सुधारक, भारतीय घटनेचे शिल्पकार, कायदेतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उरण महाविद्यालयात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी वक्ते म्हणून डॉ. एच. के.जगताप, डॉ.एम.जी. लोणे  आणि 
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ए.के गायकवाड यांनी केले प्राचार्य डॉ.वाल्मिक गर्जे यांनी मा. फुले, छ. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार अंगीकरण्याची आवश्यकता आहे असा उपदेश उपस्थितांना दिला. तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली.डॉ जगताप यांनी डॉ आंबेडकर यांचे कृषी व आर्थिक धोरण विषद केले.डॉ लोणे यांनी डॉ.आंबेडकर यांची पत्रकारिता या विषयी आपले विचार मांडले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्ता हिंगमिरे आणि आभार प्रदर्शन डॉ. ए.आर. कांबळे यांनी केले. आदर्श महापुरुषांचा वारसा व त्यांचे आदर्श गुण अंगीकरण्या बाबत या कार्यक्रमातून आवाहन करण्यात आले. जयंती निमित्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीही मोठया प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

तेजस्वी फाउंडेशन'चा गौरव सोहळा उत्साहात संपन्न !!

'तेजस्वी फाउंडेशन'चा गौरव सोहळा उत्साहात संपन्न !! **ठाणे / प्रतिनिधी : तेजस्वी फाउंडेशनतर्फे आयोजित गौरव पुरस्कार सोहळा...