Tuesday, 21 April 2026

काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल करणार !!

काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल करणार !!

** अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य माजी मंत्री आरिफ (नसीम) खान यांची टीका 

ठाणे, दि. २१ - मोदी सरकारने लोकसभेत महिला बिल आणलेच नव्हते, भाजपने घटना दुरुस्ती बिल मंजुरीसाठी मांडले होते. संसदेत बहुमत नसतानाही घटना दुरुस्ती विधयक आणून काँग्रेसला बदनाम आणि लोकशाही संपविण्याचा डाव आखला होता. वास्तविक भाजपला महिला आरक्षण द्यायचेच नसून महिलांच्या आडून घटना दुरुस्तीचा घाट घालण्यात आला होता. काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेचा पोलखोल करणार असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य माजी मंत्री आरिफ (नसीम) खान यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषेदेत सांगितले.

लोकसभेत २०२३ मध्ये महिला आरक्षण बिल काँग्रेसच्या पाठिंब्याने मंजूर झालेला आहे.  असे असताना केवळ काँग्रेसला महिला विरोधी ठरविण्यासाठी खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा डाव मोदी सरकारने कसा आखला आहे, याचा पोलखोल आज काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. महिला बिलाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोदी सरकारचा खोटेपणा दिसून आला आहे. सतत खोटे बोलून राजकारण करणारे जुमलेबाज असे भाजप सरकार असून चोर दरवाजातून  संविधान कमजोर करण्याचा घाट घातला होता. हा धोका ओळखून काँग्रेस आणि इतर पक्षांनी घटना दुरुस्तीचे बिल नामंजूर करीत लोकशाही वाचविली आहे. आता मोदी सरकारचा निर्णय त्यांच्या अंगलटी आल्याने त्यांनी महिला आरक्षण नामंजूर झाल्याचा खोटा प्रचार सुरु केला आहे. महिला आरक्षण २०२३ मध्ये मंजूर झालेला असून हे आरक्षण तात्काळ लागू करावे आणि येणाऱ्या २०२९ च्या निवडणुकीत महिलांना समान संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने यापूर्वीच केलेली आहे, असे ते म्हणाले. डेलिमिटेशनची प्रक्रिया पूर्ण करून त्याची अंमलबजावणी करावी, तशी प्रक्रिया न करता घटना दुरुस्तीच्या माध्यमातून सर्व अधिकार मोदी सरकारला हवे होते जेणेकरून आपल्या मर्जीनुसार मतदार संघाची निर्मिती करता येईल. हे विधयक मंजूर झाले असते तर लोकशाही धोक्यात आली असती म्हणून काँग्रेसने विरोध केल्याचे खान यांनी सांगितले.  महिलांवरील अत्याचार रोखण्यास अपयशी ठरलेल्या भाजपने केंद्रात आणि राज्यात महिलांना मंत्री केले आहे?  भाजपचे नेतेच महिलांवर अत्याचार करीत असताना ते का थांबविले जात नाहीत, असे प्रश्न करीत खान यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर आसूड ओढले. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ऍड. विक्रांत चव्हाण, ठाणे ग्रामीण अध्यक्ष चेतनसिंह पवार आदी नेते उपस्थित होते.

वृत्तांकन - सौ. गौरी धबडे (ठाणे )
पत्रकार

No comments:

Post a Comment

काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल करणार !!

काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल करणार !! ** अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी स...