Saturday, 18 April 2026

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्गास उत्साहात सुरुवात !!

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्गास उत्साहात सुरुवात !!

दैनिक बातमीदार प्रतिनिधी: ता. १८, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत मा.श्री.विजय जाधव, उपनियंञक, नागरी संरक्षण यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. एप्रिल १७ ते २१ २०२६ या कालावधीत दु. १२.०० ते सायं. १६.३० या वेळेत पोलिस वाहतूक नियंत्रण हॉल, पोलिस उपायुक्त, कार्यालय, तीन हात नाका, ठाणे (प.) येथे प्राथमिक प्रशिक्षण वर्ग क्र. ०९/२०२६ सुरू करण्यात आला आहे. सदर प्रशिक्षणामध्ये एकूण ५६ RSP शिक्षक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.

     प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी श्री. अनिल गावित, सहाय्यक उपनियंत्रक व मानसेवी निदेशक श्री. बिमल नथवानी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करत व्याख्याने आणि प्रात्यक्षिके सादर केलीत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थ्यांना नागरी संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन व प्रथमोपचार यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांची सखोल माहिती मिळाली.

     यावेळी मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव यांनी प्रशिक्षण वर्गास भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या कार्याबद्दल प्रोत्साहन दिले. सदर प्रशिक्षणाचे प्रभारी म्हणून सहाय्यक उपनियंत्रक श्री. अनिल गावित कार्यरत आहेत.

    हा प्रशिक्षण वर्ग आगामी दिवसांत विविध उपयुक्त विषयांवर आधारित असून प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव व कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

     सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी, नागरी संरक्षण दलाचे उपमुख्य क्षेञरक्षक, १, २, ४ व डाॅ.किशोर आढळकर, RSP चे श्री.स्वामी सर, शिंपीसर, अनेक प्रशिक्षक व ठाणे मनपा विभागीय आपत्ती व्यवस्थापन (RDMC) विभाग व TDRF चे प्रभारी श्री.यासिन तडवीजी उपस्थित होते.

     काही छायाचित्रे वरिष्ठांना माहितीसाठी सविनय सादर करण्यात आली आहेत.

– DCCD, NMC, ठाणे.

सौजन्य - विश्वनाथ राऊत सर 

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्गास उत्साहात सुरुवात !!

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्गास उत्साहात सुरुवात !! दैनिक बातमीदार प्रतिनिधी: ता. १८, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह ठाणे...