Wednesday, 22 April 2026

भिवंडीतील श्री क्षेत्र कोपर गावात सदानंद महाराज यांच्या हस्ते नव्या मंदिरात होणार नूतन मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा !!

भिवंडीतील श्री क्षेत्र कोपर गावात सदानंद महाराज यांच्या हस्ते नव्या मंदिरात होणार नूतन मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा !!

** सरपंच श्री.हेमंत चंद्रकांत घरत पंच यांची भाविकांना येण्याची विनंती

भिवंडी, दिं,२३, अरुण पाटील, (कोपर)

भिवंडी तालुक्यातील श्री क्षेत्र कोपर गाव येथे दर वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन गावचे सरपंच श्री.हेमंत चंद्रकांत घरत यांच्या माध्यमातून होत असते. यंदा नव्याने बांधलेल्या मंदिरात नूतन मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी पंच क्रोशीतल भाविकांना सरपंच व ग्रामस्थान तर्फे येण्याची विनंती करण्यात आली आहे. 

या आयोजित कार्यक्रमाचे आयोजन हे वैशाख शु.५, वार मंगळवार, दिं,  २१/४/२०२६ ते वैशाख शु १४,वार गुरुवार  दिं,३०/४/२०२६ पर्यंत होणार आहेत व ते पुढील प्रमाणे आहेत.   ---------------------------------------------------
(१) वार मंगळवार दिं ,२१/४/२०२६ रोजी सकाळी ६ ते ७ दरम्यान सरपंच श्री.हेमंत घरत व सौ.सुषमा घरत यांच्या हस्ते अभिषेक संपन्न झाला. तर सायंकाळी ५ ते ७ दरम्यान श्री हरी भजनाचा कार्यक्रम पार पडला.तर रात्री ९.३० ते १० दरम्यान सरपंच हेमंत घरत यांनी फराळ व अन्न दानाची सेवा पार पाडली.

(२) दिवस दुसरा, वार बुधवार, दीं, २२/४/२०२६ सकाळी ५ ते ७ दरम्यान काकडा आरती व नंतर सकाळी अभिषेक, व ९ ते ११ दरम्यान हरी भजन,फराळ,हरी पाठ,रात्री ७ ते ९.३०वा.दरम्यान श्रीराम कथा वाचन व सांगता कथा प्रवक्ते ह.भ.प.श्री शंकर महाराज देशमुख (लातूर).यांच्या हस्ते पार पडला.रात्री ९ ते १० दरम्यान श्री.गणेश प्रसाद वराई कामगार संघटना, कोपर यांच्या तर्फे भोजन ठेवण्यात आले होते.

(३) दिवस तिसरा,वार गुरूवार,दिं,२३/४/२०२६
सकाळी काकडा आरती, अभिषेक,हरी भजन, फराळ, सायं.हरीपाठ, व रात्री ७ ते ९.३० वा.श्री कृष्ण कथा,कथा प्रवक्ते ह.भ.प.कृष्ण महाराज शास्त्री (श्री क्षेत्र वृंदावन)यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.व रात्री भोजन समारंभ.

(४) दिवस चौथा, वार शुक्रवार,दिं‌,२४/४/२०२६
सकाळी काकडा, अभिषेक,हरी भजन, फराळ,हरी पाठ, रात्री श्री.कृष्ण कथा व सांगता सोहळा कथा प्रवक्ते ह. भ. प.कृष्ण महाराज शास्त्री (श्री क्षेत्र वृंदावन) यांच्या तर्फे होणार आहे. व रात्री भोजन समारंभ.

(५) दिवस पाचवा, वार शनिवार‌  दीं,२५/४/२०२६, व (६) दिवस सहावा, वार रविवार ,दि,२६/४/२०२६ रोजी वरील प्रमाणे नित्य कार्यक्रम होणार असून रात्री श्री हरी कथा, कथा प्रवक्ते ह.भ.प. रामदास महाराज शास्त्री (नाशिक) हे करणार असून भोजन व्यवस्था सरपंच तथा प्रो. में.रोशनी इंटरप्रायजेसचे मालक श्री.हेमंत सूर्यकांत घरत, विलास अमृत घरत, दौलत घरत यांच्या तर्फे होणार आहे.

(७) दिवस सातवा, वार सोमवार, दि,२७/४/२०२६ (८) व दिवस आठवा, वार मंगळवार,दि,२८/४/२०२६ रोजी रात्री कथा प्रवक्ते ह.भ. प.श्री.हनुमान महाराज पाटील (कोळेगाव - कल्याण)यांच्या तर्फे श्रीमद,भागवत कथा वाचन होणार आहे. 

तर या  दिवसा दरम्यान नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून तो पुढील प्रमाणे असेल.
------------------------------------------------------
(१) वैशाख शु.११(मोहिनी एकादशी) वार सोमवार दि,२७/४/२०२६ सकाळी ९ ते १० श्री.गणेश पूजन,सकाळी १० ते १२ मंडळ पूजन, सायं.४ ते ६ जल दि वास होणार आहे.

(२) वैशाख शु.१२, वार मंगळवार दि,२८/४/२०२६ सकाळी ८ते १०प्रत:मंडळ पूजन,सकाळी १०ते १२ पुष्पा दि वास,दुपारी१२ ते २ फळा दि वास, सायं.२ ते ४ हवन पूजा, सायं ४ ते ५धान्य दि वास हा कार्यक्रम होणार आहे.

(३) वैशाख शु.१३वार बुधवार दि,२९/४/२०२६ रोजी सकाळी प्रत:पूजन , दुपारी १२ ते २पूर्णाहुती व महाआरती,,दुपारीं १ते२ नूतन मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा व कलश स्थापना,दुपारी १ ते ३ श्री कोपरेश्वर प्रासादिक भजनी मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपर यांच्या कडून सेवा असे कार्यक्रम होणार आहेत.

(९) दिवस, नववा ,वार बुधवार, दिं,२९/४/२०२६, या दिवशी सकाळी १०.१०वा.श्री.गणेश,शरीर.विठ्ठल रुक्मिणी माता (श्री राम,जय हनुमान, श्री दत्त) या नव्या मंदिरात बालयोगी गुरुवर्य सदानंद (बाबा) महाराज (आगमन दुपारी २. वा ) यांच्या हस्ते मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. 

या वेळी प्रमुख उपस्थिती, श्री श्री १००८ जगद्गुरु परमहंस आचार्य (जुनी तपस्वी जी की छावणी, पीठाधिश्वर् अविध्यानगरी, श्री क्षेत्र अयोध्या),चिदानंद स्वामी चिंतामण महाराज (दिंडीगड होणारे गाव),बालयोगी मच्छिंद्रनाथ महाराज ओवळी गाव भिवंडी)
यांची असणार आहे. 

तर प्रमुख अतिथी म्हणून कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब (मा. केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री, भारत सरकार) हे उपस्थित राहणार आहेत. तर सायं.६ ते ८ वा.दरम्यान ह.भ.प.गुरुवर्य कबीर महाराज म्हात्रे (गुंदवली-भिवंडी) यांचे होणार आहे.

(१०)दिवस दहावा, वार गुरूवार, दि,३०/४/२०१६) भाषाप्रभू, ह. भ.प.श्री.जगन्नाथ महाराज पाटील(खांडवळ भिवंडी) यांच्या तर्फे हरी कीर्तन होणार आहे. व दुपारी महाप्रसाद सरपंच तथा (भोजन दाते श्री हेमंत सूर्यकांत घरत,सरपंच ग्रुप व ग्राम पंचायत कमिटी कोपर व ग्रामस्थ मंडळ कोपर )  यांच्या तर्फे होणार आहे.

 या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर अतिथी उपस्थित राहणार आहेत.
(१) मा. श्री. कपिल मोरेश्वर पाटील साहेब (मा.खासदार तथा मा. केंद्रीय "पंचायत राज" राज्य मंत्री 
(२) मा. आमदार (ग्रामीण) श्री.शांताराम तुकाराम मोरे साहेब,
(३) मा. श्री. देवेशजी पुरुषोत्तम पाटील साहेब, (उपाध्यक्ष भा ज पा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य, मा. ठाणे जिल्हा परिषद सदस्य, ठाणे)
(४) मा. श्री.सुमित पुरुषोत्त पाटील साहेब (नगर सेवक -भिवंडी) 
(५) मा. श्री. डी. के. म्हात्रे साहेब (उपाध्यक्ष महाराष्ट्र, मनसे)
(७) मा. श्री.दीप रवींद्र बने (पोलिस निरीक्षक, ATS ठाणे युनिट)
(८) मा. श्री.विजय कादभाने साहेब, (वरिष्ट पोलिस निरीक्षक, नारपोली भिवंडी) व इतर मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.

No comments:

Post a Comment

भिवंडीतील श्री क्षेत्र कोपर गावात सदानंद महाराज यांच्या हस्ते नव्या मंदिरात होणार नूतन मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा !!

भिवंडीतील श्री क्षेत्र कोपर गावात सदानंद महाराज यांच्या हस्ते नव्या मंदिरात होणार नूतन मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा !! ** सरपंच श्री.हेमंत च...