पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपा च्या वतीने अभिवादन !!
**फुले दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची ठाम मागणी
सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे, सत्यशोधक चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपाच्या वतीने विनम्र अभिवादन केले. समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या विचारांनी आपण सर्वांनी प्रेरित व्हावे, हीच खरी आदरांजली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कालिदास गाढवे, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कोकरे, विनायक रूपनवर, लक्ष्मण ठोंबरे, अँड. विजय लेंगरे, अंकुश देवडकर, अँड. बापूसाहेब डोबाळे उपस्थित होते.महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त फुले दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची ठाम मागणी केली आहे.तसेच कटगून, नायगाव व खानवडी या ऐतिहासिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देत येथे भव्य शिल्पसृष्टी उभारण्यात यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक आहे असे श्री गाढवे म्हणाले.
सौजन्य/वृत्त - विलासराव कोळेकर सर
No comments:
Post a Comment