Sunday, 26 April 2026

जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट वुमन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड !!

जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट वुमन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड !!

मुख्य राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती दुहेरी नियुक्तीने ऐतिहासिक नोंद
——————————————
दिल्लीच्या माननीय मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्षपदी घोषणा

फोटो कॅप्शन : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट ) च्या महिला विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संगीता पाटील यांच्या निवडीच्या घोषणाप्रसंगी दिल्लीच्या माननीय मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता, कॅट चे महामंत्री व खासदार प्रविण खंडेलवाल आणि कॅट चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया

जळगाव, राहुल बैसाणे : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ही देशातील सर्वात मोठी आणि प्रभावशाली व्यापारी संघटना असून, देशभरातील कोट्यवधी व्यापारी व ४०,००० हून अधिक व्यापारी संघटनांचे प्रतिनिधित्व करते. व्यापाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, धोरणात्मक प्रतिनिधित्व आणि व्यापारवृद्धीसाठी कार्य करणारी ही राष्ट्रीय संघटना आहे.

कॅट आयोजित राष्ट्रीय महिला उद्योजक शिखर परिषद नुकतीच नवी दिल्ली येथील हिंदी भवनमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या परिषदेत जळगावच्या संगीता पाटील यांनी कॅट वुमन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. तसेच त्यांची मुख्य राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. कॅटच्या इतिहासात प्रथमच एका व्यक्तीकडे राष्ट्रीय स्तरावर दोन महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी सोपविण्यात आल्याने हा निर्णय विशेष ठरला आहे.

दिल्लीच्या माननीय मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता यांच्या उपस्थितीत तसेच कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि कॅटचे महामंत्री व खासदार प्रविण खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद अत्यंत यशस्वी, प्रेरणादायी आणि उल्लेखनीयरीत्या पार पडली.

यावेळी माननीय मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता यांनी आपल्या भाषणात महिला उद्योजकतेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “महिला उद्योजकता ही देशाच्या आर्थिक विकासाची नवी शक्ती आहे. केंद्र आणि राज्य शासन महिला उद्योजकांसाठी विविध योजना आणि संधी उपलब्ध करून देत आहे, आणि अशा मंचांच्या माध्यमातून महिलांना योग्य दिशा, नेटवर्क आणि बाजारपेठ मिळत आहे, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे.

या परिषदेत देशातील विविध राज्यांमधून ४०० हून अधिक महिला उद्योजक सहभागी झाल्या. महिला उद्योजकता, फायनान्स, स्किल डेव्हलपमेंट, डिजिटल सक्षमता, MSME क्षेत्रातील संधी, स्टार्टअप्स व बाजारपेठ उपलब्धता या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.

संगीता पाटील यांचा जळगाव जिल्ह्यापासून महाराष्ट्र राज्य आणि पुढे राष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रवास उल्लेखनीय राहिला आहे. विविध संस्थांमध्ये विविध पदांवर कार्य करत त्यांनी सातत्यपूर्ण, परिणामकारक आणि समाजाभिमुख कार्याचा ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर कौशल्य विकास आणि स्वावलंबनाच्या दिशेनेही त्यांनी प्रभावी कार्य केले आहे.

आपल्या प्रभावी अध्यक्षीय भाषणात संगीता पाटील यांनी महिला उद्योजकांना संबोधित करत सांगितले की, महिलांमध्ये क्षमता, कौशल्य आणि जिद्दीची कोणतीही कमतरता नाही; त्यांना केवळ योग्य व्यासपीठ आणि संधी मिळणे आवश्यक आहे. कॅट वुमन विंग देशभरातील महिला उद्योजकांना एकत्र आणून सशक्त, संघटित आणि प्रभावी नेटवर्क निर्माण करून महिलांसाठी एक सक्षम व्यासपीठ ठरणार आहे.

“आत्मनिर्भर भारत” आणि “वोकल फॉर लोकल” या संकल्पनांना पुढे नेण्यासाठी महिलांनी उद्योग-व्यवसायात सक्रिय नेतृत्व घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. स्किल डेव्हलपमेंट, डिजिटल सक्षमता आणि मार्केट लिंकजच्या माध्यमातून महिलांना लोकल ते ग्लोबल बाजारपेठेशी जोडण्यावर विशेष भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

परिषदेत आदरणीय प्रविणजी खंडेलवाल यांनी कॅट वुमन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संगीता पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर संगीता पाटील यांनी कॅट वुमन विंगची नवीन संघटनात्मक रचना जाहीर केली, ज्यामध्ये २५ सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणी तसेच १५ विभागीय समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली.

या नव्या नेतृत्वासह उभ्या राहिलेल्या संघटनात्मक बळामुळे देशातील महिला उद्योजकतेला नवचैतन्य मिळणार असून, तिचा प्रभाव राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात अधिक ठळकपणे जाणवेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

दोन दिवसीय परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी कॅट वुमन विंगचे सर्व पदाधिकारी तसेच कॅट दिल्ली कार्यालयातील संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वय, नियोजन आणि समर्पित कार्यामुळे हा भव्य राष्ट्रीय कार्यक्रम अत्यंत सुव्यवस्थित आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट वुमन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड !!

जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट वुमन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड !! मुख्य राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी नि...