Thursday 1 November 2018

डॉक्टर च्या हलगर्जी पणा मुळे निष्पाप सृष्टी चा मृत्यू

कल्याण येथील डॉक्टर चा हलगर्जीपणामुळे
एका निष्पाप मुलीचा मृत्यू

पोलीस तक्रार घेत नसल्यामुळे आज कल्याण येथे कँडल मार्च
कल्याण - (जैनेंन्द्र सैतवाल )
            येथील कोळसेवाडी चिंचपाडा विभागात राहणारे अभिजित सोनवणे यांची सहा वर्षांची मुलगी सृष्टी हिस डेंगू झाल्याने डॉ. नितीन कोकरे यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. असा आरोप त्यांनी केला आहे. या विषयीची तक्रार कोळसेवाडी पोलीस स्टेशनला अभिजित सोनवणे गेले असता त्यांची तक्रार घेतली गेली नाही.
          दिनांक ०६ ऑक्टोबर २०१८ रोजी सृष्टी ला ताप आला, तिच्या आईने तिला साई विनीत हॉस्पिटल, कल्याण (पूर्व) येथे उपचारासाठी घेऊन गेली. डॉ कोकरे यांनी औषधउपचार करून पुन्हा ५ दिवसानंतर यायला सांगितले. सृष्टी चा ताप उतरत नव्हता म्हणून दिनांक १० ऑक्टोबर २०१८ रोजी पुन्हा साई विनीत हॉस्पिटल मध्ये तिला उपचारासाठी तिची आई घेऊन गेली. डॉक्टरांनी डेंग्यू ची टेस्ट करायला सांगितली. त्याच दिवशी रात्री १० वाजता सृष्टी ला डेंग्यू आहे असे कळाले . साई विहान चे डॉक्टर यांनी सृष्टी ला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला सांगितले. सृष्टी च्या पालकांनी तात्काळ ते मान्य करून सृष्टी ला साई विहान हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी १:०० वाजता सृष्टी चा ताप अतिशय वाढत गेला, सृष्टी ची आई स्टाफ ला विनंती करायला लागली कि कृपया डॉक्टरांना बोलावा  तरी डॉक्टर आलेच नाही. दुपारी १:३० वाजता सृष्टी ला फिट आली. डॉक्टर येऊन नंतर तिला परस्पर रॉयल चिल्ड्रेन हॉस्पिटल, कल्याण (पूर्व)  येथे पाठवले, तोपर्यंत सृष्टी बेशुद्ध झाली होती, रॉयल चिल्ड्रेन हॉस्पिटल मधून सहा तासा नंतर तिला मृत घोषित करण्यात आली. पालकांन वर दुःखाचा डोंगर कोसळला, अतिशय गोड असणारी सृष्टी एका क्षणात दिसेनासी झाली. पालकांच्या लक्षात आले कि सृष्टी ला डेंग्यू निदान झाल्यानंतर देखील साई विनीत च्या डॉक्टरांनी डेंग्यू साठी कोणतेही उपचार केले नाहीत, तिला ट्रीट करणाऱ्या नर्स प्रशिक्षित नव्हत्या. तरीही या ट्रिटमेंट चा खर्च दोन्ही हॉस्पिटल मिळून रूपये  ४४,०००/- हजार सृष्टी च्या पालकांकडून उकळले.
         पालकांनी सृष्टी च्या मृत्यू साठी साई विनीत हॉस्पिटल जबाबदार आहे अशी तक्रार दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ रोजी कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे सृष्टी चे वडील अभिजित सोनावणे यांनी केली. पोलीस यांनी चौकशी करतो असे सांगत तक्रार लिहून घेण्यास नकार दिला. आज १५ दिवस उलटून गेले आहेत. कोळसेवाडी पोलीस स्टेशन यांनी तक्रार नोंदवलीच नाही, अभिजित सोनावणे यांच्या म्हणण्या नुसार पोलीस तक्रार नोंदवण्यास मुद्दाम चाल ढकल करत आहेत.
          पोलिसांच्या या चालढकलीचा "डेमोक्रॅटिक युथ फेडेरेशन ऑफ इंडिया " (DYFI) तीव्र निषेध व्यक्त करत आहे. DYFI सोबतच या कँडल मार्च करीता, श्यामदादा गायकवाड यांचा आर पी आय सेक्युलर पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष,  भारिप पक्ष, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, तसेच अनेक पुरोगामी पक्ष आणि संघटना भाग घेत आहेत. 
          सृष्टी चा श्रद्धांजली पर कँडल मार्च दिनांक ०२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता रविकिरण अपार्टमेंट, मॉडेल कॉलेज जावळ, चिंचपाडा रोड, कल्याण (पूर्व) येथून निघेल. हा मार्च पुढे कोळसेवाडी पोलीस स्टेशन विठ्ठलवाडी स्टेशन बाजूला संपून तिथे सृष्टी ला श्रद्धांजली वाहण्यात येईल.

   

11 comments:

  1. डॉक्टर वर गुन्हा दाखल होआयला पाहिजे.

    ReplyDelete
  2. न्याय मिळाच् पाहिजे

    ReplyDelete
  3. Hospital cha registration radd karayla paije

    ReplyDelete
  4. Ashya dr la fashi vyayla pahihe

    ReplyDelete
  5. Shiksha jhalich pahije dr. La

    ReplyDelete
  6. त्या नितीन कोकरेला भर चौकात नागडा करून मरेपर्यंत फोडून काढला पाहिजे.

    ReplyDelete

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...