Tuesday, 6 November 2018

कल्याण RTO च्या सौ. चित्रा पवार सेवानिवृत्त

कल्याण येथील प्रादेशिक परिवहन कार्यलयातील जेष्ठ लिपिक सौ. चित्रा विलास पवार सेवानिवृत्त.

कल्याण - (जैनेंन्द्र सैतवाल)
           येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील जेष्ठ लिपिक सौ.चित्रा विलास पवार यांचा सेवा निवृत्तीचा सोहळा नुकताच येथील कार्यलयात सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी यांच्या सानिध्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यांना वाजत-गाजत, बँड, फटाके वाजवून व आर.टी. ओ. च्या सरकारी व्हॅन मध्ये बसवून निरोप देण्यात आला.
           सन१९८५ साली नोकरीत रुजू झालेल्या पवार मॅडम दि. २५/२/१९८५ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे येथे कामावर रुजू झाल्यात. क्लार्क कम टायपिस्ट या पदावर त्या कार्यरत होत्या.  साधारण १० वर्षे प्रादेशिक परिवहन कार्यालात काम केले. प्रथम आवक-जावक विभागाचे २ वर्ष काम केले. त्यांनी ट्रान्सपोर्ट विभागात २ वर्षे काम केले, नंतर टंकलेखनाचे काम १ वर्षे केले, त्यानंतर ५ वर्षे खटला विभागात काम केले. १९९५ मध्ये त्यांची उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात बदली झाली. साधारण १९९५ ते २००५ पर्यंत ट्रान्सपोर्ट विभागात काम केले, तसेच MSCIT चे प्रशिक्षण घेतले १९९६ ते १९९७ या कालावधीत ट्रान्सपोर्ट विभाग,आणि परवाना विभागाचे पर्वाने करण्याचे कामकाज ते पाहत होते. साधारण २० वर्षाने त्यांना सहायक रोखपाल ची पदोन्नती मिळाली. २००५ ते २०१० या कालावधी त्यांनी सहाय्यक रोखपाल म्हणून काम केले. त्या नंतर त्यांना मे २०१० ला वरिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती मिळाली. आणि त्यांना मुख्य रोखपलाचे काम देण्यात आले. २०१० -२०१२ पर्यंत मुख्य रोखपालाचे काम पाहिले, तसेच वाहनांना कर काढून देण्याचे काम पाहत होते. २०१२ -२०१५ या कालावधीत  सर्व कमर्शियल वाहनांना नंबर देणे, कमर्शियल वाहनांचे परवाना देणे, महितीअधिकार, टॅक्स काढून देणे, मासिक अहवाल तयार करणे, डिझास्टर म्यानेजमेंट, रजिस्ट्रेशन, ग्रीनटॅक्स, टाईम बोउंड, नॅशनल परमिट, मॅक्सिमायजेशन, माहिती अधिकार इत्यादी अहवाल पाठवणे, तसेच  आठवड्याची ,रेव्हेन्यू तयार करण्याचे चे काम त्या करत होत्या. शिवाय ऑडिटचे कामकाज करणे, टॅक्स एरियर्सची माहिती पाठवणे, सांख्यिकी स्टेटमेन्ट १-४२ टेबल्स भरून वर्षातून एकदा पाठवणे, कार्यक्रम अंदाज पत्रक वार्षिक अहवाल तयार करणे, इत्यादी कामे त्यांनी बघितली.त्या दरम्यान भानुदास देशपांडे , मुख्य लिपिक सेवा निवृत्त झाले होते, त्यांचा संपुर्ण कार्यभार त्यांना देण्यात आला होता. नंतर २०१५ मध्ये बदल्या करण्यात आल्या नंतर परवाना विभागाचे तसेच नम्बरिंग देणेचे काम काढुन दुसऱ्या वरीष्ठ लिपिकाना देण्यात आले,आणि होमरीजन ट्रान्सपोर्ट,आणि प्रोफेशनल टॅक्स काढणे,तसेच काही महिने इतर राज्यातून येणाऱ्या वाहनांचे रेकॉर्ड मेंटेन करणे, तसेच उरलेली सगळीच कामे सांभाळून त्या करीत होत्या. नंतर संगणकाचे कामकाज ऑक्टोम्बर २०१७ मध्ये सुरू झाले, आणि ऑनलाइन नंबर देणे, आर.सी.,फिटनेस देणेचे कामकाज आज पर्यंत त्या करत आल्यात. .२००६ मध्ये संगणकावर  IMV, BMV पावत्या फडण्याचे काम सुरू झाले, त्यावेळी त्यांनाच  MDL च्या पावत्या तयार करण्याचे काम करत आले, तसेच मॅन्युअल DD, CHQ. च्या पावत्या आणि संगणकावर नॉन ट्रान्सपोर्ट च्या पावत्या तयार करणे म्हणजे मॅन्युअल आणि कॉम्पुटर या दोन्ही प्रकारचे कामे एकटेच त्या करीत होत्या.
             खारटमल साहेबांच्या वेळी, रास्ता सुरक्षा सप्ताहाचे कामकाज बघितले, संक्रांतीच्या वेळी रस्त्यावर उभे राहून वाहने थांबवून त्यांना गुलाबाचे फुल व तिळाचे लाडू वाटण्याचा उपक्रम राबविला.                  गुजराथी साहेबांच्या काळात नवीन रिक्षा परवान्यांचे कामकाज सुरू झाले असताना स्वतःचे कामकाज सांभाळून रिक्षा परवाना धारकांचे आलेली कागद पत्र तपासणी करणेची कामे केली.
           त्यांच्या ट्रान्सपोर्ट विभागात वाहन धारकांना कर सम्बधी मागणी पत्रके पाठवणे, ना-वापर वाहनांना तपासणी करणे करता मोटार वाहन निरीक्षकांना याद्या तयार करून देणे, पत्र व्यवहार करणे, मोटार वाहन निरीक्षकांना कर न भरलेल्या वाहनांच्या याद्या कर वसुलीच्या कामासाठी तयार करून देणे, आणि आयत्यावेळी आलेली कामे पार पाडणे.
        कॅरेज बाय रोड ऍक्ट २००५ नुसार व्यवसाय करणे सम्बधी लायसन्स देणे, ३/३ च्या केसेस, परिवहन आयुक्तांना कर माफी विषयी पत्र व्यवहार करणे,आर.आर.सी.तयार करून नोटीसा बजावणे, अशी अनेक विविध कामे पवार मॅडम यांनी केली, अशा या कर्तव्यदक्ष वरिष्ठ-जेष्ठ लिपिक महिला अधिकारी सौ चित्रा पवार यांना सेवानिवृत्तीचा निरोप देताना त्यांच्या समवेत असलेल्या महिला सहकारी कर्मचाऱ्याना अश्रू अनावर झाले. पण तरीही सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधी यांनी त्यांना वाजत-गाजत बँड, फटाके वाजऊन निरोप दिला.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...