संभाजी ब्रिगेडचे कल्याण-डोंबिवली महानगर अध्यक्ष प्रभाकर भोईर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न
टिटवाळा - (जैनेंन्द्र सैतवाल)
सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावाजलेले नाव म्हणजे संभाजी ब्रिगेड. या संभाजी ब्रिगेड चे कल्याण-डोंबिवली महानगर अध्यक्ष व मांडा-टिटवाळा येथील रहिवाशी असलेले प्रभाकर भोईर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी त्यांच्या मित्रपरिवाराने मोठ्या उत्साहात साजरा केला.
सकाळी, घरातील जेष्टांचे व श्री क्षेत्र असलेल्या टिटवाळा सिद्धिविनायक महागणपती चे दर्शन व आशीर्वाद घेऊन प्रभाकर भोईर यांच्या मित्रांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.
सकाळी महागणपती हॉस्पिटल येथे प्रभाकर भोईर यांनी रक्तदान केले. वाढदिवसानिमित्त रक्तदान केल्याचा खूप आनंद व समाधान वाटले, तसेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे भोईर यांनी या प्रसंगी सांगितले.
तद्नंतर दुपारी टिटवाळया जवळील गुरवली येथील राईट्स ऑफ वुमन संचालित आईची सावली या बाल-भवनातील मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य, खाऊ व प्राथमिक उपचारासाठी मेडिकल बॉक्स ही दिला. वर्षभर बाल-भवनातील पाण्याची टाकी मोफत स्वच्छ करणार असल्याचे व येथील २२ मुला- मुलींचा वर्षभर शैक्षणिक व आरोग्य उपचाराची जबादारी प्रभाकर भोईर यांनी घेतल्याचे पत्र संचालिका दीपा गांगुर्डे यांना दिले. या व्यतिरिक्तही अजून काही मदत लागत असेल तर तुम्ही सांगा व मी ते करेल असे या प्रसंगी भोईर म्हणाले.
संध्याकाळी त्यांच्या ऑफिस मध्ये ऑफिस कर्मचाऱ्यानी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. शेवटी सर्व मित्र परिवाराचे आभार त्यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment