Thursday, 8 November 2018

राजाभाऊ पातकर यांच्या हस्ते दैनिक बातमीदार व बातमीदार माझा चॅनलच्या विभागीय कार्यलयाचे उद्घाटन

राजाभाऊ पातकर यांच्या हस्ते दै.बातमीदार व बातमीदार माझा चॅनल च्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
कल्याण - (जैनेंन्द्र सैतवाल)
            दिवाळी मधील आज साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त म्हणून पाडवा संबोधला जातो. या शुभ मुहूर्तावर सन १९३५ पासून जळगाव येथे सुरू असलेल्या दैनिक बातमीदार चे मुंबई-ठाणे-कोकण विभागीय कार्यालय व बातमीदार माझा u tube चॅनलचे ही कार्यालयाचे, कल्याण येथे, प्रसिद्ध उद्योगपती श्री. मा. राजकुमारजी (राजाभाऊ) पातकर व सपत्नीक (सौ. राखी पातकर) यांच्या हस्ते करण्यात आले.
           सकाळी या विभागीय कार्यलयाचे उद्घाटन राजाभाऊ पातकर यांनी आपल्या पत्नी सह फित कापून केले. नंतर दीप प्रज्वलन करून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी त्यांनी निपक्ष, बेधडक पत्रकारितेबद्दल कौतुक करून सर्व सामान्य जनतेचा आवाज बनून दैनिक बातमीदार व बातमीदार माझाआपले कार्य या पुढे करेल असे मनोगत व्यक्त केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
           विभागीय कार्यकारी संपादक सचिन बुटाला व व्यवस्थापकीय संपादक जैनेंन्द्र सैतवाल यांनी राजाभाऊ पातकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच ज्ञानेश्वर पाटील यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी सौ. राखी पातकर यांचेही स्वागत सौ. सीमा सैतवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
        याप्रसंगी सचिन भोईर, मितेश बुटाला, रिया पातकर, व पातकर, सैतवाल, बुटाला परिवार व मित्र परिवार या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...