Sunday, 11 November 2018

एक छोटीशी मदत पण, डोंगराएव्हड्या स्वप्नांना आकार देणारी

"सांगड "या सामाजिक संस्थेकडून इंन्फटला दिवाळी निमित्त मदतीचा हात.

सांगड संस्थेने " हम साथ-साथ है " चे दर्शन घडविले.

ठाणे - ( प्रतिनिधी)
            ठाणे, टिटवाळा येथील सांगड या सामाजिक संस्थेने HIV. सह जगणाऱ्या  इंन्फट इंडियाच्या ७५  अनाथ व उपेक्षित बालकांच्या दिवाळीचा किराणा सामान भरून अनाथाची दिवाळी साजरी केली.
      सांगडच्या सर्व सहकारी मित्राच्या मदतीने २५७००/- रूपयांचे दिवाळीचे सामान या वेळी इंन्फट इंडिया संस्थेस भरुन दिले. त्याबद्दल सांगडचे विषेश कौतुक जनतेकडून होत आहे.
          तसेच "एक छोटीशी मदत पण डोंगराएवढ्या स्वप्नांना आकार देणारी....! अशी ठरली.
दिवाळीचं दान वंचितांच्या पहाट फुलवण्यासाठी..!
यंदाची दिवाळी खर्या अर्थाने वंचितांसाठी साजरी झाल्याचे समाधान या सर्व सांगड च्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. अनाथ, निराधार, व्याधीग्रस्त मुलांचा " इंफट इंडीया—पाली (बीड)"  या प्रकल्पातील मुलांसाठी रुपये २५७००/— दिवाळी भेट सर्व सांगड च्या मित्रांनी मिळून ज।आ केली.
या कार्यात समर्थ साथ देणारे हितचिंतक,मित्र परीवारांचे खुप खुप आभार या कार्यकर्त्यांनी मानले .
          दिवाळीच्या पहील्या दिवशी (वासुबारस )टिटवाळा गुरवली येथील " आईची सावली "  या अनाथ मुलांच्या वस्तीगृहास भेट देऊन मुलांना फटाके,मिठाई,दिवाळी फराळ व दररोजच्या उपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या.
           या दान महोत्सवात सहभागी होऊन वंचित बालकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यास मदत देणारे दाते:—
१) सिद्धेश्वर फड - १०००/-
२) श्रीकृष्णा सोनावणे - ८००/-
३) विजय आव्हाड - १०००/-
४) गणपत पालवे - १०००/-
५) इंद्रेश यादव - ८००/-
६) पंढरीनाथ भालेराव - १०००/-
७) सचिन येवले - १५००/- वस्तु स्वरुपात
८) सचिन भोजने - १०००/—
९) अर्जुन घुगे - ४०००/-
१०) शिवाजी दराडे - १०००/-
११)आरती भार्जे—१५००/—
१२)विठ्ठल पवार-१०००/—
१३)निलेश पिसाळ—१०००/—
१४)श्री.हंगरगे साहेब -५०००/
१५)अनिल फड—१६००/—
१६)अनामिक दाता—५००/—
१७)अनामिक दाता—५००/—
१८)राजाराम सांगळे—१०००/—
१९)उपेंद्र सिंग—१०००/—
२०)प्रविण सुतार—१०००/—
२१)अमोल पवार—१६००/—
२२)प्रितम—८००/—.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...