अतिरेक्याच्या हल्यात जखमी झालेल्या जवानाचे जवखेडे खालसा गावात जोरदार स्वागत
जवखेडे खालसा,ता.पाथर्डी, जि. अहमदनगर येथील भुमिपुत्र ऋषिकेश आंधळे हा भारतीय सैन्य दलामध्ये पॅरा
पाथर्डी - (प्रतिनिधी ) -
कमांडो फोर्स दलात गेल्या चार वर्षापासुन कार्यरत आहे,सध्या तो काश्मीर खोऱ्यात अतिसंवेदनशील भागात सोफियान येथे देशसेवेत कार्यरत आहे,शुक्रवार पाच ऑगस्ट २०१८ रोजी या जवानाच्या बटालियनला मेमेनडर गावामध्ये अतिरेकी घुसल्याची खबर मिळाल्याबरोबर ही १७ जवांनाची फौज अतिरेक्यावर कारवायी करण्यासाठी आर्मीच्या गाडीत निघाली असता पहाडी भागामध्ये सदर गाडीला सुरूंगाच्या स्फोटात उडविण्यात आले गाडी पलटी होऊन अपघात झाल्यामुळे सतरा जवान जखमी झाले,त्यांच्यावर एक महिना सैनिक दवाखान्यात उपचार केल्यानंतर विश्रांतीसाठी घरी पाठविण्यात आले,व ज्या दिवशी ऋषिकेश घरी येणार होता त्याच दिवशी योगायोगाने त्याचा वाढदिवस असल्यामुळे अमोल वाघ व अॅड.वैभव आंधळे मित्र मडंळाच्या वतीने ऋषिकेशचे जवखेडे खालसा गावामध्ये फटाक्याच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करून देशसेवेविषयीचे आपले प्रेम याव्दारे व्यक्त केले,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मंत्रालयातील प्रधान सचिवांचे विशेषकार्यकारी आधिकारी डॉ.बाबासाहेब राजळे,ठाणे जिल्हा येथील पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड, पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी हे उपस्थित होते,प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ऋषिकेश यांच्यासह जवखेडे खालसा कासारवाडी गावातील सर्व आजी माजी सैनिकांचा सन्मान व गौरव करण्यात आला यावेळी डॉ.राजळे यांनी तरूणांनी भारतीय सेवेमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करावेत व गावामध्ये स्पर्धा परिक्षेसाठी ग्रंथालय सुरू करावेत त्यासाठी लागणारे पुस्तके मी स्वतः देईल असे आश्वासन दिले, पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी जवखेडे गावात पस्तीस आजी माजी सैनिक असल्याने गावचे कौतुक केले तर पाथर्डीचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यावेळी बोलताना म्हणाले की, अमोल वाघ व अॅड. वैभव आंधळे मित्रमडंळाने आज जो कार्यक्रम ठेवला आहे तो अतिशय स्तुत्य असुन या उपक्रमामुळे युवकांना स्फुर्ती देण्याचे काम केले आहे,व जास्तीत जास्त युवकांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करून शारीरीक व्यायाम ही करावा जेणे करून पोलिस व आर्मी भरतीमध्ये अडचणी येणार नाहीत,असे सांगुन गावातील चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सुचना केली.
याप्रसंगी आजी माजी सैनिकांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमास जेष्ठ नेते पोपटराव आंधळे,अमोल वाघ,अॅड. वैभव आंधळे,अॅड. राजेंद्र कासार, अंजिक्य आंधळे, महमंद पठाण, वसंत पोटे,बाळासाहेब भोसले, इरफान पठाण,जगन्नाथ आंधळे, कैलास वाघ,नितीन जाधव,विजय भोसले,प्रा.राजेंद्र वाघ,उध्दव मतकर,संभाजी आंधळे,प्रकाश वाघ,उत्तम आंधळे,भुजंग भताने, दिलीप आंधळे,दिलीप शिंदे, संकेत आंधळे,रंगनाथ मतकर, गोरक्ष काळे,भास्कर आंधळे,प्रा.रविंद्र जाधव,एकनाथ आंधळे,लालुभाई शेख,संजय खंडागळे,आयुब शेख,गुलाब शेख,रमेश कासार,संतोष उगले, दत्ता गायकवाड यांच्यासह आजी माजी सैनिकांचे नातेवाईक,जेष्ठ नागरिक व युवकमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते,प्रारंभी प्रास्ताविक अॅड.वैभव आंधळे यांनी तर शेवटी आभार मच्छिंद्र लांघे सर यांनी मानले.
प्रतिनीधी सुनिल नजन अहमदनगर -(पाथर्डी शेवगाव विधानसभा )
No comments:
Post a Comment