टिटवाळा येथील होणाऱ्या डंपिंग ग्राऊंडला सर्व स्तरातून विरोध
सर्व पक्षीयांचा सुद्धा डंपिंग ला विरोध
टिटवाळा - (जैनेंन्द्र सैतवाल)
टिटवाळा हे श्री क्षेत्र व पर्यटन स्थळ असून देखील महाराष्ट्र प्रदूषण विभागाने येथे आज जनसुनावणी डंपिंग ग्राउंड बाबतीत ठेवली आहे. या डंपिंग ग्राऊंडला सर्व टिटवाळा-मांडा परिसरातील नागरिक विविध बैठका, मिटिंग घेऊन विरोध करीत आहेत. व यात सर्व पक्षीय पदाधिकारी एकत्र येऊन या डंपिंग ग्राऊं ग्राऊंडला विरोध दर्शवित आहेत.
येथील स्थानिक नगरसेविका व उपमहापौर सौ। उपेक्षा शक्तिवान भोईर याही बऱ्याच वर्षांपासून या मांडा-टिटवाळा येथे होणाऱ्या डंपिंग ला विरोध करीत आहेत. तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक हेही विरोध करून ठीक-ठिकाणी मिटिंग घरून निषेध व्यक्त करीत आहेत.
येथील नागरिक न घाबरता बिनधास्त आपल्या प्रतिक्रीया देत आहेत. त्याच काही नागरिकांच्या प्रतिक्रिया.
टिटवाळा शहरात होणार्या डंपिंग ग्राउंडला रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आ) तर्फे मी पुर्णपणे विरोध करत आहे.
या ग्राउंडमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. पर्यटक क्षेत्र म्हणून नावाजलेल्या टिटवाळा शहराचा विकास थंडावेल, पर्यटकांवर परीणाम होईल.
शासनाने याबाबत पुनर्विचार करावा.
अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.
हरीश कांबळे.
ठाणे जिल्हा सचिव
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आ)
टिटवाळाकर जागा हो..
जनांदोलनाचा या धागा हो....
माय-बाप टिटवाळाकर जनतेला अंत्यत कळकळीची आणि आग्रहाची नम्र विनंती आहे कि ,आपल्या स्वच्छ ,सुंदर,आणि आरोग्यमयी मांडा -टिटवाळा (प) येथे KDMC ने आपल्या महाराष्ट्र सरकारने पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित केलेल्या या श्रीक्षेत्र टिटवाळा मध्ये 150 मे. टन कचरा डेपो (डम्पिंग ग्राउंड )करण्याचा घाट घातला आहे.परंतु हा प्रकल्प फक्त आपल्या मांडा -टिटवाळा येथील कचरा टाकण्यासाठीच आहे.असे गृहीत अजिबात धरू नये.कारण टिटवाळा लगच्या परिसरातील जमिनी जास्त प्रमाणात वनविभागाच्या आहेत.म्हणून या मोकळ्या जमिनीवर आज 150 मे. टन आणि हळूहळू काही वर्षांनी 500 मेट्रिक टनचा कचरा डेपो येथे होऊ शकतो.त्यामुळे या प्रकल्पाविरोधात आजच काय विरोध करता येईल तेवढा करणे आवश्यक आहे.मित्रांनो महानगरपालिका आपल्याला मोठे मोठे आश्वासनं देणार कि आम्ही हा प्रोजेक्ट करू ,तो प्रोजेक्ट करू परन्तु प्रत्यक्षात करेल का नाही हा एक अनुत्तरीत प्रश्नच आहे????त्यामुळे आपण यांच्यावर विश्वास ठेऊन हा प्रकल्प का होऊ द्यायचा???? जो कि पूर्णपणे नियम बाह्य आहे....ज्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांनी आखून दिलेल्या नियमाचे पूर्णपणे उल्लंघन करत आहे...चला तर मग या प्रकल्पाविरोधात आवाज उठवा...सर्वांनी एक होऊया....
कारण सवाल आपल्या भविष्याचा...सवाल आपल्या आरोग्याचा....आणि सवाल आपल्या पर्यटन तिर्थक्षेत्राचा....आहे.
या प्रकल्पाला विरोध का करावा....
1)प्रकल्प नियमबाह्य आहे.ज्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या नियमांचे उल्लंघन होते.
2)श्रीक्षेत्र टिटवाळा पर्यटन क्षेत्र म्हणून दर्जा प्राप्त असताना पर्यटकांच्या आरोग्याचा कोणताही विचार न करता पर्यटन क्षेत्राजवळ असे डंम्पिंग ग्राउंड योग्य नाही.
3)लोकवस्ती पासून दूर तळोजा येथे जागा उपलब्ध असताना टिटवाळा लोकवस्ती जवळ हा प्रकल्प लादला जात आहे.
4)आज जरी या डम्पिंग ग्राउंडची 150 मे. टन क्षमता दाखवली असली तरी ती उद्या 500 मे. टन होऊ शकते .
5)स्वच्छ आणि सुंदर टिटवाळा म्हणून आमची ओळख जपण्यासाठी.
6)सर्वात महत्वाचं म्हणजे ना कोण्या एका राजकीय पक्ष किंवा नेत्यासाठी तर फक्त आणि फक्त आमच्या सर्वांच्या उद्याच्या उज्जवल भविष्यासाठी.
मांडा-टिटवाळा येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राऊंडमुळे सर्वात पहिला फटका येथील पर्यटन क्षेत्राला आणि भाविकांना बसणार आहे. त्याचबरोबर येथील हजारो रिक्षा चालक,छोटे व्यावसायिक यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.भविष्यात काळू नदीला पूर येऊन हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या कचरा डेपोतील संपूर्ण कचरा काळू नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जाणार त्यामुळे नदीलगतच्या गावातील लोकांचे जनजीवन धोक्यात येणार आहे.
त्यामुळे हा प्रकल्प भविष्यातील होणारे जनजीवनावरील गंभीर परिणामाचा विचार करून दुसरीकडे न्यावा....
के.के.केंद्रे
नागरिक टिटवाळा
डम्पिंगला विरोध मांडा टिटवाळा परिसरात खूप मोठया तीव्रतेने सर्व पक्षीय ,सर्व स्तरातून नागरिकांकडून होत आहे याची तीव्रता नक्कीच 14 तारीख जनसुनावणीला दिसून येईल नागरिकांनी सर्व ठिकाणी ,प्रत्येक भागात डम्पिंग हटाव मोहिमसाठी सह्यांची मोहीम,जनजागृती हाती घेतली आहे,कल्याण येथील डम्पिंग न्यायालयीन कारवाईमुळे माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार कोंडीत अडकलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून टिटवाळा वासीयांच्या माथी हा डम्पिंग प्रकल्प बळजबरी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ यांना चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करून अहवाल घेण्याचा प्रयत्न महापालिका करणार असेल तर नागरिकांना आजही प्रथम प्राथमिक मूलभूत गरज आरोग्यसेवा ही देता आली नाही त्या महापालिकेला नागरिकांसाठी विविध आजारांचे दुकान डम्पिंग ग्राउंड नागरिकांच्या माथी मारण्याचा काहीच अधिकार नाही याची जाणीव आपल्या डम्पिंग वर बहिष्कारातून दाखवून देतील दांडेलशाहीचा वापर करून हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही न्यायालयात दाद मागून आमचे हक्क मागून न्याय मिळवण्याची तयारी आहे जर हा प्रकल्प झाला तर सर्वात आधी पर्यटन स्थळ हे नाव पुसून नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागेल आणी हे येथील नागरिकांना कदापी मान्य नाही याची नोंद महानगर पालिकेने घ्यावी*
डम्पिंग हटाव
टिटवाळा बचाव
समस्त मांडा टिटवाळा दक्षनागरिक
एक दक्ष नागरिक
प्रभाकर राजाराम भोईर
No comments:
Post a Comment