Friday, 17 April 2020

नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी केले गरजूंना भाजीपाला वाटप

नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी केले गरजूंना भाजीपाला वाटप
प्रतिनिधी, कल्याण.
कल्याण पश्चिम मिलिंद नगर येथील रहिवासी नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील (कामगार नेते) यांनी त्यांच्या प्रभाग नंबर १६ मध्ये गोर गरीब कुटुंबांना केले भाजीपाला वाटप.
देशात व राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे हात होऊ नये याकरिता काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती गोरगरिब कुटुंबांना सढळ हस्ते मदत करीत आहेत. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाची उपासमार होऊ नये याकरिता सामाजिक कार्य समजून समाजामध्ये दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशात त्यांच्या त्यांच्या विभागात मदत केली जात आहे. असेच कल्याण शहरात मिलिंद नगर प्रभाग नंबर १६ मधील नागरिकांना कोणत्याही अडचणीत सतत मदतीला धावून येणारे दानशूर व्यक्तिमत्व नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व कामगार नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी सुध्दा आपल्या स्वखर्चाने गोरगरिब तसेच गरजवंत कुटुंबांना रोजच्या आहारातील भाजीपाला जो लॉकडाऊन मुळे महाग व गायब झाला आहे त्याचे वाटप केले.
नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व कामगार नेते ज्ञानेश्वर पाटील हे आपली नोकरी व व्यवसाय सांभाळून नेहमीच सामाजिक कामामध्ये अग्रेसर होऊन आपल्या प्रभागात काम करीत असतात. असेच राज्यावर आलेले कोरोनाचे संकट यामुळे भरडली गेलेली गोरगरीब नागरिक यांना ज्ञानेश्वर पाटील यांनी भाजीपाला वाटप केले. यांच्या सोबत यांचे सहकारी मा. नगरसेवक सुरेंद्र आढाव, सचिन भोईर, प्रकाश सोनावले, आर्किटेक्ट गणेश नाईक, जेष्ठ समाजसेवक सुनील उतेकर, संदिप पाटील, दुर्योधन पाटील, गणेश पाटील, रवी भोईर उपस्थित होते
नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व कामगार नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की जोपर्यंत कोरोनाचे संकट आहे तोपर्यंत तसेच पुढे सुध्दा आमच्या प्रभागात गरजूंना मदत करणार.

No comments:

Post a Comment

नवी मुंबई मधील भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलूतेदार यांना मिळाला न्याय ! मनोज कोळी, मयूर कोळी यांच्या पाठपुराव्याला यश !!

नवी मुंबई मधील भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलूतेदार यांना मिळाला न्याय ! मनोज कोळी, मयूर कोळी यांच्या पाठपुराव्याला यश !! ** मा. उच्...