Monday, 20 April 2020

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती" च्या वतीने गरजु गरीब मजुर व विस्थापित कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप

*"अन्याय अत्याचार निर्मुलन समिती" च्या वतीने गरजु गरीब मजुर व विस्थापित कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप...*

महेंद्र (अण्णा) पंडित, पनवेल
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉक-डाऊन मुळे विस्थापित कामगार व गोरगरीब मजुरांचे अतोनात हाल होत आहेत. शासनाच्या वतीने कम्युनिटी किचन व शिवभोजन थाळी इत्यादींच्या माध्यमातून दोन वेळचे जेवण पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु उपासमारीच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने अनेक स्वयंसेवी संस्थांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक कोरोना आपत्कालीन परिस्थितीत कोणीही उपाशी पोटी राहू नये या शासनाच्या हाकेला साद देत संपुर्ण राज्यात अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारी सामाजिक संघटना अर्थात "अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य" या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र (दादा) जाधव यांचे आदेशाने व संघटनेचे राज्य-सचिव महेंद्र तथा अण्णा पंडित. यांच्या मार्गदर्शनाखाली अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके यांच्या पुढाकाराने पनवेल परिसरातील आदिवासी भागात व इतर गावांमधील विस्थापित कामगार, रिक्षाचालक, हातावर पोट असणारे मजुर व गरीब गरजु कुटुंबीयांची चुल पेटावी या सामाजिक जाणीवेतुन तांदूळ, डाळी, खाद्यतेल, मसाले व कांदे-बटाटे इ. जिवनावश्यक वस्तुंचे पाकीट बनवून आतापर्यंत शेकडो कुटुंबीयांना त्याचे वाटप करण्यात आले आहे.
संघटनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके यांनी राज्य सचिव अण्णा पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे जयंतीदिनापासुन ते लॉक-डाऊनचा कालावधी पुर्ण होईपर्यंत गरीब विस्थापित मजुर व गरजवंत कुटुंबांना अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्याचा संकल्प केला असुन या कामी "अन्याय अत्याचार निर्मुलन समिती" या संघटनेचे विशाल कांबळे, संदेश गायकवाड, परेश भोईर इत्यादींचे सहकार्य लाभत आहे. 
लॉक-डाऊनचा कालावधी ३ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आला असल्याने याचा विपरित परिणाम झोपडपट्टीत राहणाऱ्या व मोलमजुरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करणा-या जनतेच्या मानसिकतेवर होत आहे. त्यांची चिंता कमी व्हावी व आपणही समाजाचे देणेकरी आहोत या जाणिवेतून "अन्याय अत्याचार निर्मुलन समितीने" नासिक मध्ये निफाड, चांदवड, दिंडोरी व इतर अनेक तालुक्यांसह धुळे जळगाव जिल्ह्यांमध्येही समितीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे आदेशाने तेथील स्थानिक जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील विविध दानशूरांच्या मदतीने विस्थापितांना व गरजवंतांना जिवनावश्यक वस्तुंची मदत करण्याचे काम अविरतपणे चालू आहे.

No comments:

Post a Comment

माहिती अधिकार कायदा मोजतोय अंतिम घटका ? - "हजारो प्रकरणे" वर्षानुवर्षे प्रलंबित !!

माहिती अधिकार कायदा मोजतोय अंतिम घटका ? - "हजारो प्रकरणे" वर्षानुवर्षे प्रलंबित !! **माहिती वेळेत देण्याकडे शासकीय अधिकारी कर्मचाऱ...