सेक्स वर्कर यांना आधार फौंडेशनच्या वतीने मदतीचा हात
प्रतिनिधी, कल्याण.
कल्याण पुर्व चिंचपाडा, लक्ष्मीनगर येथील महिला सेक्स वर्कर आणि त्यांच्या परिवाराला आधार फौंडेशनच्या वतीने जेवण तसेच राशन सामुग्री देण्यात आली.
आधार फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चिराग आनंद यांनी सांगितले की देशात व राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य कुटुंबाचे हाल होऊ नये याकरिता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आमच्या आधार फौंडेशनकडून सतत कल्याण व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात लहान मुले ते वयोवृद्ध गरजवंत नागरिकांना जेवण व राशन सामुग्री पुरवली जात आहे यामध्ये अनेकांचा सहभाग लाभला आहे.
याचप्रमाणे कल्याण पुर्व चिंचपाडा लक्ष्मीनगर येथील महिला सेक्स वर्कर व त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरी जाऊन जेवण व राशन सामुग्री पुरवली त्यावेळी महिला समाज सेविका कल्पना साळवी, डॉक्टर सविता चिराग आनंद, राजेंद्र साळवी व संस्थेचे इतर सदस्य सुध्दा होते. यावेळी त्या वस्तीतील एका महिलेला कुत्रा चालल्यामुळे ती अस्वस्थ होती तीला डॉक्टर सविता चिराग आनंद यांनी मेडिकल स्टोरमधून इंजेक्शन आणले व औषधे देऊन तिच्यावर उपचार केले.
No comments:
Post a Comment