बिर्ला उद्योग समूहाची शहाड येथील सेंचुरी कंपनी अडिज महिन्यानंतर पुन्हा सुरू, प्रारंभी फक्त एका शिफ्ट मध्ये उत्पादन!
कल्याण (संजय कांबळे) कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देश लाॅकडाऊण झाला आणि देशातील प्रमुख उद्योगपती असलेल्या बिर्ला समुहाची कल्याण मुरबाड महामार्गाशेजारी शहाड येथे असलेली सेंच्युरी कंपनी बंद झाली. धगधगता बाॅयलर थंडावला पण पुन्हा एकदा आज ही कंपनी सुरू झाली असून सोशलडिस्टींग चे पालन करित केवळ जनरल या एकाच शिफ्ट मध्ये अडिज महिन्यानंतर कंपनी च्या चिमणीमधून धुर निघू लागलाय.
सुमारे ५० /६० वर्षांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती बिरला यांनी कल्याण मुरबाड महामार्गावर शहाड येथे सेंच्युरी कंपनी सुरू केली. शेकडो एकर जागेत ही कंपनी विस्तारलेला असून कपड्यांचा धागा आणि टायर चा धागा येथे तयार होत असून आजुबाजुला असलेल्या आयडिया, एन आर सी या कंपन्या बंद पडल्याने ही कंपनी एकमेव कामगारांचा आधार आहे. कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा पावशेपाडा रायते, आपटी आणे भिसोळ, नांलिबी, गोवेली पिंपळोली दहागाव, बापसई मामणोली, खडवली फळेगाव मानिवली टिटवाळा मोहना आंबिवली या गावासह शहाड गावठाण, धाकटेशहाड, उल्हासनगर येथील कामगार येथे काम करत आहेत.
कंपनीमध्ये ५/६ हजार कामगार कायमस्वरूपी आहेत, २००० पर्यत तात्पुरत्या स्वरुपात तर ४ हजाराच्या आसपास ठेकेदारी पद्धतीने काम करीत आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लाॅकडाऊन झाला आणि २४ मार्च २०२० रोजी कंपनी बंद झाली. अशा परिस्थितीत इतर उद्योग व्यवसायातील कामगारांची जी उपासमार झाली व जो त्रास सहन करावा लागला तो त्रास आपल्या कामागारांना सहन करावा लागु नये यासाठी कामगार संघटना व कंपनी यांनी विचार विनिमय करून कामगारांना गेले दोन महिने पुर्ण पगार दिला. आता लाॅकडाऊन मध्ये थोडी शिथिलता आली असल्याने कंपनी व्यवस्थापनाने आज पासून कायमस्वरूपी कामगारांना ज्याच्या गावात किंवा परिसरात कोरोनाचा पेंशंट नाही, ज्यांचा एरिया कंटेन्मेंट झोन नाही अशा भागातील मर्यादित कामगारांना कामावर बोलावले आहे. पुर्वी तीन शिफ्ट मध्ये काम सुरू होते पण आता केवळ जनरल एकच शिफ्ट सुरू करण्यात आली आहे कंपनीने सोशलडिस्टन्स साठी राउंड मारले असून सॅनिटायझर व मास्क वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कंपनीला लागणारा कच्चा माल कोळसा व पल यांच्या शेकडो गाड्या कंपनी गेटसमोर उभ्या राहिल्या आहेत. सेंच्युरी हाॅस्पिटल मधील नर्स कोरोना पाॅझिटिव आल्याने हाॅस्पिटल सध्या सील करण्यात आले आहे त्यामुळे येथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कंपनीत देखील सोशलडिस्टींग चे पालन व्यवस्थित होते किंवा नाही, तसेच कामगारांची सुरक्षितता यासाठी कंपनीच्या आत पोलीस कर्मचारी व शासकीय कर्मचारी तैनात असणे अतिशय गरजेचे आहे कारण काही चुकीच्या प्रवृत्तीच्या टारगट कर्मचाऱ्यांकडून कंपनीने कितीही दबाव टाकला तरी आत मध्ये पालन होणे कठीण आहे या साठी कंपनीच्या आत पोलीस बंदोबस्त असावा असे कामगारांचे म्हणने आहे.


No comments:
Post a Comment