Monday, 25 May 2020

म्हारळ मध्ये कंटेन्मेंट झोन वरुन राडा ग्रामपंचायत कर्मचा-याला धक्काबुक्की, पोलीसांनकडून मुबलक "डोस"?

म्हारळ मध्ये कंटेन्मेंट झोन वरुन राडा ग्रामपंचायत कर्मचा-याला धक्काबुक्की, पोलीसांनकडून मुबलक "डोस"?



कल्याण (संजय कांबळे) कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हादरून गेले असताना काही उड्डाणटप्पूना मात्र याचे काहीच सोयरसुतक सुतक नसल्याची बाब नुकतीच म्हारळ गावातून पुढे आली आहे. येथे कंटेन्मेंट झोन का लागू केला, परिसर का शिल केला याचा आम्हाला त्रास होतो यावरून गावात तीन वेगवेगळ्या प्रकारे राडा झाला. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचा-याला धक्काबुक्की करण्यात आली. पण ही बाब म्हारळ पोलीस चौकीचे इन्स्पेक्टर बंजरंग रजपूत यांना समजताच त्यांनी बेजबाबदार वयस्क बाळाला "पोलीसी खाक्या डोस" मुबलक प्रमाणात दिल्याने सध्या वातावरण कडक उन्हाळ्यात "थंडगार" झाले आहे.
कल्याण तालुक्यातील म्हारळ गाव कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहिले आहे. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी येथे जिल्ह्यातील पहिला "काॅलरा" चा रुग्ण सापडला होता. आता सध्या कोरोनोच्या धसक्याने देश राज्य, जिल्हा हादरून गेला आहे. कल्याण तालुक्याच्या आजुबाजुला मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. पण काल परवा पर्यंत तालुका कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत होता. पण दोन दिवसापूर्वी तालुक्यातील म्हारळ गावातील गावदेवी मंदिर परिसरात एक पोलीस शिपाई कोरोनाचा पाॅझिटिव आढळून आला. यावेळी म्हारळ ग्रामपंचायतीचे अधिकारी कर्मचारी, दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ रमेश राठोड, म्हारळ पोलीस चौकीचे इन्स्पेक्टर बंजरंग रजपूत व सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन परिसर शील केला. तर म्हारळ ग्रामपंचायतीने सर्व नागरिकांना सूचित केले की म्हारळ गावातील गावदेवी मंदिर समोर कोव्हीड 19 (कोरोना पाॅझिटिव) रुग्ण आढळून आलेला असून गावदेवी मंदिराच्या समोरिल मध्यभागापासून 500 मीटर अंतरावर कंटेन्मेंट झोन घोषित केलेला आहे. तरी या परिसरात कोणीही शिरकाव करू नये, असा फलक म्हारळ ग्रामपंचायतीने लावला असताना. तसेच हा परिसर शील केला असताना काही महाभागांनी हा रस्ता तोडला, तर येथे कर्तव्यावर असलेल्या ग्रामपंचायत कर्मचा-याला धक्काबुक्की केली. हा राडा पोलीसांना कळताच म्हारळ पोलीस चौकीचे इन्स्पेक्टर बंजरंग रजपूत व सहकारी घटनास्थळी धाव घेतली हा परिसर का शील केला आहे, तो कोणासाठी आहे, डाॅक्टर नर्स, पोलीस कोणासाठी जीव धोक्यात घालून सेवा करताहेत हे समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा या अतिशहाणांन्यावर काहीही परिणाम होईना तेव्हा मात्र पोलिसांनी "खाकी ब्रम्हास्त्र" सोडले आणि या वयस्क बाळांना मुबलक प्रमाणात "डोस" दिला शिवाय यांच्या विरोधात एनसी दाखल केली.या बातमीमध्ये मुद्दाम आपण त्याचे नाव छापले नाही, कारण त्यांनी जरी ***सोडून डोक्याला बांधले तरी आपण सामाजिक भान ठेवायला हवे, 
असो, मुर्खाना कोण समजावणार? 
सध्या कल्याण तालुक्याच्या हद्दीच्या अगदी शेजारी कोरोनाचा धोका वाढला आहे. म्हारळ गावाला लागून असलेल्या धोबीघाट, खेमाणी, सेंच्युरी, उल्हासनगर येथे कोरोनाचा हाहाकार उडाला आहे. तालुक्यातील मानिवली गावाशेजारील असणाऱ्या आंबिवली, मोहना, टिटवाळा येथे रुग्ण वाढत आहेत, आपटी, जांभूळ वसत, आणे भिसोळ, नांलिबी या गावाजवळील बदलापूर, अंबरनाथ येथे कोरोनोचा आलेख चढता आहे. अशा परिस्थितीत आपल्या कल्याण तालुका ग्रामीण हद्दीत केवळ म्हारळ गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तो वाढू नये, याचा प्रादुर्भाव शेजारच्या वरप कांबा पावशेपाडा, रायते आणे भिसोळ किंवा गोवेली या शेजारच्या गावात होऊ नये म्हणून आपण थोडे दिवस घरीच राहून किंवा अजून थोडा त्रास सहन करुन प्रशासना ला पोलिसांना सहकार्य केले तर उद्याचे आपले आरोग्य व भविष्य नक्कीच उज्वल व निरोगी असणार आहे. पण या मुर्खाना कोण समजावणार? त्यामुळे मग उंगली तेडी करना पडती है! असाच काहीसा प्रकार म्हारळ येथे झाला.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...