Sunday, 24 May 2020

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती व महाराष्ट्र तेज न्युज टीमचे उल्लेखनीय मदत कार्य

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती" व "महाराष्ट्र तेज न्युज" टिमचे उल्लेखनीय मदत कार्य...


कल्याण - (अण्णा पंडित) कोरोना महामारी मुळे सद्यस्थितीत समाजातील प्रत्येक वर्ग हवालदिल झाला आहे, पण सगळ्यात जास्त परिस्थिती बिकट झाली आहे ती मध्यम वर्गीयांची. लॉकडाऊन अजून काही दिवस वाढला  तरी श्रीमंतांना काही फरक पडणार नाही तसेच जे जास्त गरीब आहेत त्यांना मदत करण्यासाठी समाजातील अनेक दानशूर व सामाजिक संस्था पुढे येत आहेत. परंतु मध्यमवर्गीय लोकांना कोणीही मदत करायला तयार नाही व लाजेखातर हे कोणाकडे याचना ही करत नाहीत. 


असाच प्रकार डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्याचे समोरील भागातील रहिवाशांच्या सोबत घडला आहे. कामाचा पगार ही नाही व घरात धान्य ही नाही अशा परिस्थितीत तांदळाची पेज करून तेच मुलांना खायला द्यावे व आले दिवस ढकलावे .


अशातच तेथील स्थानिक रहिवासी जयश्री कोपर्डिकर यांनी महाराष्ट्र तेज न्युज निवेदिका कल्याणी ताई आगटे यांना संपर्क करून सर्व माहिती दिली व कोणत्याही राजकीय पक्षांनी आणि स्थानिक नगरसेवक यांनी काहीही मदत केली नसल्याचे सांगितले. ही सर्व माहिती मिळताच महाराष्ट्र तेज न्युज टिम कामाला लागली व त्वरित काही पत्रकार बांधवांना व सामाजिक संस्थांना संपर्क साधला तेव्हा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे राज्य सचिव व श्रमिक पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र तथा अण्णा पंडित यांनी कल्याण येथील अजिंठा फाऊंडेशन चे संस्थापक-अध्यक्ष मा.अजय सावंत यांना भेटून सर्व प्रकार सांगितला तेव्हा मा.अजय सावंत यांनी त्वरित काही तांदूळ, डाळ,कांदे,बटाटे यांचे पाकीट तयार करून दिले व दोन तीन दिवसात अजूनही जिवनावश्यक सामग्री देण्यात येईल असे आश्वासन दिले. पत्रकारांनी ती सामग्री गरजूंना पोच केली तेव्हा त्यांच्या डोळे आनंदाने भरून आले. 
ह्यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी अण्णा पंडीत तेज न्युजचे संपादक श्यामभाऊ जांबोलीकर उपसंपादक शरद घुडे व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अमीत साळवे, सुनील भोसले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अज़िंठा फ़ाउंडेशनचे अजय सावंत, अन्याय अत्याचार निर्मुलन समिती राज्य-सचिव अण्णा पंडित व महाराष्ट्र तेज न्युज चे संपादक शामभाऊ जांबोलीकर यांचे संबंधितानी आभार व्यक्त केले आहेत.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...