Sunday, 24 May 2020

गेली अनेक वर्षांपासून तुटलेल्या पुलामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष : नागरिक नवीन पुलाच्या प्रतिक्षेत

गेली अनेक वर्षांपासून तुटलेल्या  पुलामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष : नागरिक नवीन पुलाच्या प्रतिक्षेत



     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील  माणगांव तालुक्याच्या खरवली ते बोरघर पंचक्रोशीतील शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि या विभागाती सर्व सामान्य नागरिकांना नदीच्या पलीकडे असलेल्या आपापल्या शेतावर आणि नाईटणे, बोर्ले, सुर्ले आणि मोर्बा इत्यादी ठिकाणी आपल्या कामासाठी उन्हाळ्यात आणि   पावसाळ्यात जाण्यासाठी महत्त्वाचा दुवा असणाऱ्या चेरवली आणि नाईटणे दरम्यान च्या नदी वरील पुल जीर्ण झाल्यामुळे गेली अनेक वर्षांपासून नदी पात्रात तुटून पडला आहे. त्यामुळे या पुलावरून नदीच्या अलिकडे आणि पलिकडे दोन्ही बाजूला आपापल्या कामानिमित्त येजा करणार्या शेतकरी कामगार, शेतमजूर आणि सर्व सामान्य  नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे या विभागातील सर्व नागरिक या ठिकाणी नवीन पुलाच्या प्रतिक्षेत आहेत. 
      सदर पुल सुमारे साठ ते सत्तरच्या दशकात काळ प्रकल्प सिंचन विभाग तथा कालवा विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आला होता. कारण काल प्रकल्प विभागाने माणगांव तालुक्यातील खरवली विभागातील खरवली, चेरवली, पेण तर्फे तळे, नाईटणे, सुरव, बोर्ले, सुर्ले, मोर्बा, देगाव, महादपोली, दहिवली, गोरेगांव इत्यादी ठिकाणच्या शेतकर्यांची एक पिकी जमीन ओलीताखाली आणून ती दोन पिकी तथा दुबार पिकी करून या विभागातील शेतकर्यांना समृद्ध करण्यासाठी या विभागातून सुमारे साठ ते सत्तरच्या दशकात कालवा खोदून सदर कालव्याच्या माध्यमातून या विभागातील शेतीला पाणी सोडण्यात आले. 
      सदर कालवा माणगांव तालुक्यातील खरवली विभागातून पुढे मोर्बा विभागातील गावांकडे नेण्यासाठी चेरवली आणि नाईटणे दरम्यान असलेल्या नदीचा या काल प्रकल्पात अडसर ठरत होता. यावर मात करण्यासाठी या प्रकल्पातील तत्कालीन अभियंत्यांनी सदर नदीच्या खालून भूयारी पद्धतीने पुढे कालव्याचे पाणी नेण्याची व्यवस्था केली. व या कालव्याची पुढे देखभाल करण्यासाठी सदर कालव्याला सर्वत्र समांतर रस्त्याची निर्मिती केली. व सदर नदीवर पूल बांधला. या पुलाच्या माध्यमातून या विभागातील नागरिक नदीच्या दोन्ही बाजूला आपापल्या शेतावर कामासाठी आणि मोर्बा बाजारपेठेत जाण्यासाठी व या विभागातील गावांमध्ये दळणवळणासाठी येजा करत होते. मात्र गेली दहा ते पंधरा वर्षांपूर्वी सदर पुल जीर्ण झाल्यामुळे नदीच्या पात्रात मध्यभागी कोसळून पडला आहे. तेव्हा पासून आज पर्यंत या तुटलेल्या पुलावरून जीवघेणी कसरत करून येजा करत आहेत. या मधून संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. आणि जीवीत हानी सुद्धा नाकारता येत नाही. या तुटलेल्या पुलाकडे
 संबंधित विभागाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी गेली अनेक वर्षे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या विभागातील सर्व शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या विभागातील सर्व नागरिक या पुलाच्या प्रतिक्षेत आहेत.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...