विठ्ठलवाडी पोलीसांतर्फे पत्रकार, पोलीस, होमगार्ड व आर. पी. एफ. साठी प्राथमिक आरोग्य चाचणी अभियान
महाराष्ट्रात प्रथमच अशा शिबिराचे आयोजन
सिद्धांत गाडे उल्हासनगर -
कोरोना महामारीच्या संकटात, २४ तास जनहितार्थ कर्तव्यास तत्पर असणाऱ्या पोलीस प्रशासन, पत्रकार, होमगार्ड व सी आर पी एफ च्या शिलेदारां साठी आयोजित प्राथमिक आरोग्य चाचणीस चांगला प्रतिसाद मिळाला व त्यामुळे आपण सुरक्षित तर परिवार सुरक्षित, ही व्याख्या त्यानिमित्ताने अधोरेखित झाली.
कोव्हिड - १९ च्या प्रादुर्भावाने पोलीस व पत्रकार अनेक ठिकाणी विळख्यात सापडल्याचे आढळून आल्याने, त्याच बचावात्मक धोरणास अनुसरून, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. डी. डी. टेळे. यांच्या मार्गदर्शनास्पर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भामे व त्यांच्या कर्मचार्यांनी आयोजिलेल्या प्राथमिक आरोग्य शिबीराचा अनेकांनी लाभ घेतला. एकूणच १५५ जणांनी भाग घेतलेल्या ह्या शिबिरात पोलीस, वाहतूक शाखेचे पोलीस, एस. आर. पी. , होमगार्ड आणि पत्रकारांचा समावेश होता.
या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक दिलीप मालवण कर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. डी. डी. टेळे यांनी तपासणी करून करण्यात आले.
शिबिरात शरीराचे तापमान, रक्तदाब, मधुमेह च्या चाचण्या घेवून, कॅल्शियम वर्धक गोळ्या देण्यात आल्या. ह्या सगळ्या चाचण्या हिंदुजा रुग्णालयातून पाचारण करण्यात आलेल्या डॉ चंदर रोहरा आणि टीम यांनी केल्या व त्यांना स्थानिय डॉक्टर्स डॉ प्रशांत पवार, डॉ तुलसी यांनी देखील मदत केली.
पत्रकार मुरलीधर शिर्के यांनी सोशल मीडिया वर पत्रकारांच्या आरोग्य विषयक सर्वच स्तरातून होणारे दुर्लक्षा विषयी व्यक्त केलेली खंत आणि त्याच अनुषंगाने वरिष्ठ पत्रकार काका भोसले यांनी केलेल्या सूचने नुसार, ह्या गंभीर बाबीस ओळखून, तत्काळ ह्या शिबीराचे आयोजन करण्यात आले व असे शिबिर हे महाराष्ट्रात प्रथमच आयोजित करण्यात आल्याचे, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भामे ह्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले.
सकाळी ११ ते दुपारी ४ वाजे पर्यंत आयोजिलेल्या शिबिरात, शहरातील २५० हून अधिक पत्रकार, जे विविध कार्यक्रमात व पत्रकार कक्षात तासंतास गर्दी करतात, त्यातील फक्त ४५ जणांनीच ह्या आरोग्य शिबीरात हजेरी लावल्याने, सामाजिक भान व आरोग्य विषयक सदर मंडळींची असलेली जागृतता, ह्या विषयी पोलीस खात्या सह शहरातील नागरिकां मध्ये चर्चा सध्या जोरात आहे.
No comments:
Post a Comment