माणगांव पोलीसांनी तालुक्यातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून दिला मानवतेचा संदेश
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणू प्रतिबंधक लाॅकडाऊन संचारबंदी कालावधीत रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी तथा डीवायएसपी श्री. शशिकिरण काशिद आणि कर्तव्य तत्पर पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले तसेच त्यांचे सर्व पोलीस सहकारी यांच्या माध्यमातून माणगांव तालुक्यातील विविध ठिकाणच्या गावातील गरजूंना जीवनावश्यक अन्नधान्य किराणा वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले.
शुक्रवार दिनांक ०१/०५/२०२० रोजी अर्थात महाराष्ट्र दिन व कामगार दिनी माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी तथा डीवायएसपी श्री. शशिकिरण काशिद व कर्तव्य तत्पर पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले आणि त्यांचे पोलीस सहकारी यांच्या माध्यमातून माणगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निवी, मुठवली, उमरोली, कशेने, पेन तर्फे तळे, भादाव, विहुले कोंड, रानवडे, नळेफोडवाडी, कडापे, मांजुर्णे आणि ताम्हाणे इत्यादी गावातील संजय गांधी निराधार योजनेतील गरजू कुटुंबीयातील वयोवृद्ध महिला व पुरुषाना आम्ही प्रत्येकी ४ किलो तांदुळ, १ किलो कांदे व १ किलो बटाटे असे १०० अन्नधान्य पॅकेटचे वाटप केले. त्यामुळे पुन्हा एकदा माणगांव तालुक्यातील सर्व नागरिकांना पोलीसांच्या सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्या प्रमाणे खाकी वर्गातील माणुसकीचे दर्शन झाले आहे. त्यामुळे माणगांव तालुक्यातील सर्व नागरिकांच्या मनात माणगांव पोलीसांच्या विषयी एक आदरयुक्त भावना निर्माण होऊन पोलीसांच्या मानवतावादी परोपकारी सद्भावनेचा प्रत्ययकारी साक्षात्कार झाला. त्यामुळे माणगांव तालुक्यातील सर्व जनतेतून पोलीसांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment